मुंबई। आज( २९ आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात चौथा वनडे सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.
त्याने या सामन्यात १३७ चेंडूत १६२ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने २० चौकार आणि ४ षटकार मारला. त्याने त्याचे हे शतक ९८ चेंडूत पूर्ण केले. त्याचे हे २१ वे वनडे शतक आहे. रोहितला ४४ व्या षटकात अॅशले नर्सने बाद केले. त्याचा झेल चंद्रपॉल हेमराजने घेतला.
याबरोबरच रोहितने या सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
रोहितने केलेले खास विक्रम:
१. जून २०१३पासून वन-डे केलेली शतके-
४४- रोहित+ विराट
३६- टीम पाकिस्तान
३९- श्रीलंका
४०- न्यूझीलंड
४५- आॅस्ट्रेलिया
२. सलामीवीर असताना जलद १९वन-डे शतके करणारे खेळाडू-
१०२- हशिम आमला
१०७- रोहित शर्मा
११५- सचिन तेंडूलकर
१५२- तिलकरत्ने दिलशान
१७२- ख्रिस गेल
३. २०१८मध्ये सर्वाधिक वन-डे शतकं करणारे खेळाडू-
६- विराट कोहली
५- रोहित शर्मा
४- जाॅनी बेअरस्ट्रो
३- शिखर धवन
४. जलद २१ शतके करणारे खेळाडू (डाव)-
११६- हशिम अमला
१३८- विराट कोहली
१८३- एबी डिव्हीलियर्स
१८६- रोहित शर्मा
५. सलामीवीर असताना सर्वाधिक शतके करणारे भारतीय-
४५- सचिन तेंडूलकर
१९- सौरव गांगुली
१९- रोहित शर्मा
१५- शिखर धवन
६. सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (१ जानेवारी २०१५ पासून)-
३९९१- विराट कोहली सामने – ६९
३५७८- रोहित शर्मा, सामने – ६६
३४४८- जो रुट, सामने – ७८
३१११- केन विलियम्सन, सामने – ६८
३०२३- मार्टिन गप्टील, सामने – ६९
७. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज-
२१८ – एमएस धोनी
१९८ – रोहित शर्मा
१९५ – सचिन तेंडुलकर
१९० – सौरव गांगुली
१५५ – युवराज सिंग
८. वनडेमध्ये सर्वाधिकवेळा १५०+ धावा करणारे फलंदाज-
७ रोहित शर्मा
५ सचिन तेंडुलकर
४ सनथ जयसुर्या, ख्रिस गेल, हाशिम अमला, विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट नाही तर रोहित शर्माच ठरला खरा किंग, जाणून घ्या काय आहे कारण…
–हिटमॅन रोहित शर्माने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम
–तब्बल अठरा वर्षांनंतर हा संघ खेळणार रणजी ट्रॉफी