टी२० क्रिकेटचा शोध लागल्यानंतर वनडे क्रिकेटमध्येही मोठ्या प्रमाणावर धावा होऊ लागल्या आहेत. आजकाल सर्व संघ वनडे क्रिकेटमध्ये ३००पेक्षा जास्त धावा सहज करतात. अशा परिस्थितीत असे अनेक गोलंदाज आहेत, ज्यांना विशेष लक्ष्य केले जाते आणि या गोलंदाजांविरुद्ध अधिक धावा केल्या जातात. फलंदाज बर्याचदा विशिष्ट गोलंदाजाला लक्ष्य करतात आणि त्याच्या गोलंदाजीच्या कोट्यात खूप धावा करतात. कधीकधी फलंदाज षटकाला लक्ष्य करताना दिसतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला त्या ५ फलंदाजांबद्दल सांगत आहोत, ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा केल्या आहेत.
वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज-
५ .शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – ३२ धावा
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक जबरदस्त खेळी खेळल्या आहेत आणि अनेक लांब षटकार मारले आहेत. त्याने २००७ मध्ये श्रीलंकेचा गोलंदाज मलिंगा बंदारा याच्या एका षटकात सर्वाधिक धावा केल्या होत्या. अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात त्याने बंदाराच्या षटकात एकूण ३२ धावा केल्या आणि त्या षटकात ४ षटकार आणि २ चौकार मारले.
४. जेम्स नीशम (न्यूझीलंड) – ३४ धावा
न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज जेम्स नीशमने थिसारा परेराच्या षटकात अनेक धावा केल्या होत्या. २०१८-१९ मध्ये, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात माउंट मॉन्गानुई येथे एक वनडे सामना खेळला जात होता. यादरम्यान थिसारा परेराच्या याच षटकात जेम्स नीशमने ३४ धावा दिल्या.
३.एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) – ३४ धावा
एबी डिव्हिलियर्सने २०१५ मध्ये सिडनी येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक सामन्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरच्या एका षटकात सर्वाधिक धावा केल्या होत्या. होल्डरच्या त्या षटकात त्याने एकूण ३४ धावा केल्या.
२.थिसारा परेरा (श्रीलंका) – ३५ धावा
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला. २०१३ मध्ये पल्लेकेले येथे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामना खेळला जात होता. यादरम्यान त्याने आरजे पीटरसनच्या एका षटकात ३५ धावा केल्या.
१.हर्षल गिब्स (दक्षिण आफ्रिका) – ३६ धावा
हर्षल गिब्सने २००७ च्या विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. डॅन व्हॅन बुंगेच्या षटकात त्याने ६ चेंडूत सलग ६ षटकार ठोकले आणि एकूण ३६ धावा केल्या. या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने ‘या’ दिग्गजालाही केले क्लीन बोल्ड, हिसकावून घेतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट
अवघ्या ७ मिनीटात गॅरी कर्स्टन झाले होते टीम इंडियाचे कोच, पाहा कसे