पुर्ण बातमी वाचायची असेल तर हेडलाईनवर क्लिक करा.
काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत
भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारताकडून २०१७मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही. याबद्दल त्याने आता आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
तो म्हणाला, “मला आजपर्यंत समजले नाही की मी संघातून बाहेर का आहे. मी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तरीही मला संघात स्थान दिलेले नाही.” त्याने पुढे सांगितले की, त्याला न सांगता संघातून वगळण्यात आले होते. मी त्यावेळी कर्णधार विराट कोहलीशी (Virat Kohli) मदत मागितली होती. परंतु मदत मिळाली नाही.
ड्रेसिंग रुममध्ये मला मारणार होते रिचर्ड्स, पाय पकडून मागितली माफी
पाकिस्तानचे माजी कर्णधार वसिम अक्रम यांनी खुलासा केला आहे की, वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्स हे एकदा अक्रमला मारणार होते. भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोपडा यांच्याशी इंस्टाग्रामवर बोलताना अक्रमने या गोष्टीचा खुलासा केला.
याविषयी बोलताना अक्रम म्हणाले, “रिचर्ड्स मला मारण्यासाठी ड्रेसिंग रुमच्या बाहेर बालकनीत आले होते. त्यामुळे त्यांच्या मारापासून वाचण्यासाठी मी त्यांचे पाय पकडले आणि त्यांनी मला माफ केले होते. ही घटना १९८८साली बोर्बाडोस येथे घडली होती. त्यावेळी पाकिस्तान संघ वेस्ट इंडिज कसोटी दौऱ्यावर गेला होता.’
शोएब अख्तर मारणार होता हरभजन सिंगला, भज्जीच्या हाॅटेल रुममध्ये..
भज्जीबरोबर झालेल्या एका घटनेचाही या लाईव्ह सेशनमध्ये अख्तरने खुलासा केला.
“हरभजन सिंगला मारण्यासाठी मी त्याच्या हॉटेल रुममध्ये गेलो होतो. आमच्यासोबत खातोस, फिरतोस, संस्कृती (पंजाबी) सारखी आहे. पंजाबी आहेस, माझ्या धाकट्या भावासारखा आहेस आणि माझ्यासोबत गैरवर्तन?” असे तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियन खेळाडू नेहमी म्हणायचे, भारताच्या त्या वाघापासून चार हात दुरच बरं
भारताकडून अनेक खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. यात सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंगचा समावेश आहे. त्यातही गोलंदाज म्हणून हरभजन सिंगची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार राहिली आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू हरभजनपासून लांब रहा असे म्हणायचे, असा खूलासाही नुकताच सुरेश रैनाने इरफान पठाणबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटवर बोलताना केला आहे.
दुसऱ्या कोणत्या देशाकडून खेळत असता तर सेहवागने केल्या असत्या १० हजार धावा
पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागची खूप प्रशंसा केली आहे. त्यांनी सेहवागला गेमचेंजर म्हटले आहे. लतीफ म्हणाले की, सेहवाग नेहमी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांसारख्या महान क्रिकेटपटूंच्या सानिध्यात राहिला आहे. पण, त्याची तेवढी प्रशंसा झाली नाही जेवढ्याचा तो हक्कदार होता.
पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज लतीफ पुढे म्हणाले की, सेहवाग जर भारताऐवजी दुसऱ्या संघाकडून खेळला असता. तर, त्याच्या कसोटीत ८ हजार नाही तर १० हजार धावा झाल्या असत्या. हे सर्व लतीफ युट्यूबवरील एका व्हिडिओत पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिडा पत्रकार डॉ. नुमान नियाज यांच्यांशी बोलताना म्हणाले.