आयपीएलच्या 14 व्या पर्वाला अवघ्या काही दिवसांतच सुरूवात होणार असून 9 एप्रिल 30 मे दरम्यान हे संपूर्ण आयपीएल सत्र भारतातच होणार आहे. गेल्या वर्षी कोविड-19 मुळे आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीत करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांचा अभाव जाणवला होता. पण खेळाडूंचे कुटुंबीय सदस्य आणि काही निवडक लोक संघाच्या सहकार्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. यावेळी संपूर्ण आयपीएल हंगामात असे अनेक क्षण घडले, ज्यामुळे खेळाडूंनी लोकांची मने जिंकली.
तर चला मग आज आयपीएल 2020 मधील काही सर्वोत्कृष्ट क्षणांबद्दल आढावा घेऊया…
– 25 ऑक्टोबर रोजी आयपीएलच्या 44 व्या सामन्यात कोहली आणि अनुष्का यांच्यात डोळ्याच्या इशाऱ्याने संवाद झाला होता. अचानक विराटने जेवण केले का असे डोळ्याने अनुष्काला खुणावले होते. कॅमेरामनने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. विराटच्या प्रश्नावर अनुष्काने लज्जित होऊन त्याला हो असे उत्तर दिले होते.
– किंग्ज इलेव्हन पंजाबचा हंगामाच्या सुरूवातीस बाहेर गेलेला ख्रिस गेल मध्यंतरी खेळायला आला आणि त्याने संघाचा डाव संभाळला, पण संघाला अंतिम फेरीपर्यंत तो पोहोचवू शकला नाही. मालिकेतून बाहेर पडल्यानंतरही तो दुबईत पार्टी करताना दिसला. त्याचे अनेक व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
– आयपीएलच्या मध्यंतरी भारतीय संघाचा आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस आला होता. पहिल्यांदाच त्याने आपला वाढदिवस आयपीएल संघासोबत साजरा केला. यानंतर तो अनुष्का शर्मासोबत डेटवर गेला, त्यादरम्यान ते दोघेही बर्यापैकी रोमँटिक दिसले होते.
– गेल्यावर्षी, आयपीएलमध्ये आरसीबीचा अजून एक खेळाडू आणि त्याची पत्नी चर्चेत आले होते. ते म्हणजे युजवेंद्र चहल त्याची पत्नी धनश्री वर्मा. आयपीएलमधील चहलची चमकदार कामगिरी पाहून लोक धनश्री वर्माला त्याच्या आयुष्यातील भाग्यवान व्यक्ति मानत होते. मैदानाबाहेरही हे जोडपे कधी हॉटेलमध्ये, कधी समुद्र किनाऱ्यावर एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले दिसले होते.
– आयपीएल 2020 मधील युवा फलंदाज ईशान किशनने खेळलेली चमकदार खेळी कोणालाही विसरता येणार नाही. त्याने अंतिम सामन्यात 19 चेंडूत 33 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच मागील वर्षी त्याने आरसीबीविरुद्ध 99 धावांची जबरदस्त अशी खेळी केली होती, परंतु मुंबई पराभूत झाल्यानंतर तो मैदानावर रडू लागला होता.
– 18 ऑक्टोबर 2020 रोजी पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामना कोणालाच विसरता येणारा नाही. हा रोमांचक सामना एक नव्हे तर दोन सुपर षटकांतून निश्चित झाला होता. पण या सामन्यातील थरार सोडला, तर आणखी एका कारणामुळे हा सामना प्रसिद्ध झाला होता तो म्हणजे स्टेडियममध्ये असलेल्या एका रहस्यमयीन मुलीमुळे. सामन्यात दाखवलेल्या एका झलकीनंतर ही मुलगी खूप व्हायरल झाली होती. लोकांनी तीला गूगलवरती शोधायला सुरू केले होते.
– आयपीएलच्या 6 व्या सामन्यात पंजाब सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 97 धावांनी पराभव केला. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने 69 चेंडूंत 132 धावा केल्या होत्या. त्यावेळी पंजाब संघाची मालकिन प्रीती झिंटा संघाला शुभेच्छा देण्यासाठी मैदानात आली होती.
– नीता अंबानी आपला मुलगा आकाश अंबानी हे दोघे आपला संघ मुंबई इंडियन्सचा महत्त्वपूर्ण प्लेऑफ सामना पाहण्यासाठी युएईला पोहोचले होते. या सामन्यादरम्यान नीता अंबानीची छायाचित्रेही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. पण या सामन्यात नीताऐवजी आणखी दुसरे कोणीतरी मंत्र वाचताना दिसले होते. त्या निता अंबानी यांच्या कुटुंबातील कोणीतरी नातलग पुस्तक हातात घेऊन जप करताना दिसल्या होत्या.
– तसेच आयपीएलच्या 13व्या सत्राच्या अंतिम सामन्याच्या 11 व्या षटकात सूर्यकुमार यादवने कर्णधार रोहित शर्मासाठी आपल्या विकेटचा बळी दिला होता आणि 19 धावा करून माघारी परतला होता. रोहित देखील त्याच्या या निर्णयामुळे खूप निराश दिसत होता आणि उदास होऊन जमिनीवर बसला होता. त्यानंतर सूर्याबद्दल चाहत्यांच्या मनात आदर वाढला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतातील सर्वात सुंदर स्टेडियमवर होणार आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकाचा पहिला सामना!
दिलदार धोनी, मोठ्या मनाचा रोहित; ‘ही’ गोष्ट घडताच संजू सॅमसनला मेसेज करुन म्हणाले…