टोरंटो फुटबॉलच्या काही चाहत्यांमुळे चालू सामन्यात स्टेडियममध्ये आग लागली. कॅनेडियन चॅम्पियनशीपमधील टोरंटो विरुद्ध ओटवा फ्युरी या उपांत्य सामन्यादरम्यान ही घटना घडली.
यावेळी या चाहत्यांनी फटाके पेटवून ते मैदानावर टाकले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यांच्या कारनाम्यामुळे तेथील पोलिसांनी त्या चाहत्यांना बाहेर काढले.
या सामन्यात टोरंटोने ओटवाला 1-0ने पराभूत केले होते. यावेळी सामन्याच्या दुसऱ्या सत्रात चाहत्यांनी जल्लोष साजरा करताना हे घडले. टोरंटोच्या चाहत्यांबरोबरच फ्युरीच्याही चाहत्यांचा गोंधळ सुरू होता.
Way to go @tfc supporters. Starting a fire, burning your banners, and nice explosion. pic.twitter.com/Q2lPlnyexw
— Paul Mullin (@paulmullin13) July 19, 2018
https://twitter.com/JennJefferys/status/1019753283022393345
यामध्ये पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नसून त्याचा तपास सुरू आहे. तसेच टोरंटो फुटबॉलचे बॅनर्सही जाळण्यात आले.
हे दोन संघ 25जुलैला परत एकदा अमेरिकेतील मेजर लीग सॉकर या स्पर्धेत समोरा-समोर येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–रोनाल्डिन्होने एकाच सामन्यात केले होते तब्बल 23 गोल
–स्वीडनच्या या फुटबॉलपटूला बेकहॅमच्या म्हणण्यानुसार घालावी लागेल इंग्लंडची जर्सी