कोरोना व्हायरस या महामारीमुळे ओढवलेल्या परिस्थितीनंतर आयपीएल २०२०चे आयोजन होणे ही खूप मोठी गोष्ट होती. आयपीएलच्या या हंगामावर ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२०ची तलवार लटकत होती. पण अथक परिश्रमांनतर शेवटी बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीत आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजला. आता हीच टी२० लीग यशस्वीरित्या पार पडण्याच्या वाटेवर आहे.
मात्र दुसऱ्या बाजूला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले आयपीएलचे संघ आयपीएल २०२१ची आतुरतेने वाट पाहत असावेत. अशात या हंगामाचे आयोजन कुठे, कधी होईल? त्यापूर्वी मेगा लिलाव होईल का मिनी लिलाव होईल? अशा चर्चां रंगू लागल्या आहेत. चला तर जाणून घेऊया, सद्य परिस्थितीला पाहता आयपीएल २०२१मध्ये कोणत्या गोष्टी होण्याची शक्यता आहे?
मेगा का मिनी लिलाव?
आयपीएल २०२०चा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. कारण आता स्पर्धेचा क्वालिफायर २ आणि अंतिम सामना असे केवळ दोन सामने उरले आहेत. या सामन्यांद्वारे मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांपैकी कोणता संघ विजेतेपद पटकावेल, हे कळेल. याव्यतिरिक्त उर्वरित चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ फार पूर्वीच हंगामातून बाहेर पडले आहेत.
त्यामुळे या संघांना पुढील लिलावाची आतुरता लागली असेल. अशात बीसीसीआय पुढील वर्षी मेगा लिलावाचे आयोजन करेल का मिनी लिलावाचे? हा प्रश्न संघमालकांच्या मनात घोंगावत असेल.
लिलावाविषयी गांगुलीचे काय आहे म्हणणे?
या वर्षाच्या सुरुवातीला अशी चर्चा चालू होती की, बीसीसीआय कोविड-१९मुळे आयपीएल २०२१चा मेगा लिलाव रद्द करु शकते. परंतु, बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने याविषयी माहिती दिली आहे. हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला की, “आयपीएल २०२१च्या लिलावा संदर्भात आम्ही अजून तरी काही ठरवलेले नाही. आयपीएल २०२०चा हंगाम संपल्यानंतर आम्ही यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ.”
कधी व कुठे होणार आयपीएल २०२१?
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन मार्च २०२१ ते मे २०२१ या कालावधी दरम्यान होण्याची शक्यता आहे. यावर्षी भारतातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीत करण्यात आले आहे. मात्र बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने यापूर्वी स्पष्ट केले होते की, “आयपीएल २०२१ चे आयोजन भारतातच होईल. आशा आहे की तेव्हापर्यंत कोरोनाची लस निघेल. जेणेकरुन भारतातच पुढील हंगामाचे आयोजन केले जाईल. परंतु जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर पुढील वर्षीही युएईतच आयपीएल खेळवले जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘चहल तू अपमानाचा नाही तर ट्रॉफीचा हक्कदार, आरसीबी सोड आणि…’, चाहत्याची अजब प्रतिक्रिया
‘भारतीय क्रिकेटर्स खूप बदमाश झालेत,’ माजी पाकिस्तानी खेळाडूचे मोठे विधान; जाणून घ्या पूर्ण प्रकरण
‘माझं मन मानायला तयार नाही; सूर्यकुमारची…’, माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार