दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ माउंट मौनगानुईला पोहोचला. येथे खेळाडूंचे पारंपरिक नृत्यासोबत स्वागत केले गेले. याचा व्हिडिओ कुलदीप यादव आणि श्रेयस अय्यर यांनी शेयर केला. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेदेखील (बीसीसीआय) स्वागताचे फोटो पोस्ट केले असून त्यामध्ये इशान किशन, मोहम्मद सिराज इत्यादी खेळाडू दिसत आहेत. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली भारत रविवारी (20 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे.
भारतीय खेळाडू जेव्हा बे ओव्हलमध्ये पोहोचले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या मुलींनी मोओरी पावोरी हे खास पारंपरिक नृत्य करत खेळाडूंचे स्वागत केले. याचा व्हिडिओ श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेयर केला असून ते पाहताना अंगावर काटे आले असे त्याने स्टोरीमध्ये लिहिले. कुलदीप यादव (Kuldeep YAdav) यानेही इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना त्याचे कौतुक केले.
भारतीय संघातील काही खेळाडू टी20 विश्वचषक झाल्यानंतर न्यूझीलंडला रवाना झाले होते. या दौऱ्यात भारत टी20 मालिकेबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत असून वनडे मालिकेत शिखर धवन करणार आहे. तसेच न्यूझीलंडसाठी दोन्ही मालिकेत केन विल्यसमन कर्णधार आहे.
https://www.instagram.com/reel/ClIP1Injg91/?utm_source=ig_web_copy_link
टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यात चांगली सुरूवात करण्याच्या हेतूने उतरतील. भारताच्या संघात नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, आर अश्विन, दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी यांना वगळले आहे, तर टी20 विश्वचषकात खेळलेले पंड्यासोबत सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रिषभ पंत यांचा न्यूझीलंड दौऱ्याच्या टी20 संघात समावेश आहे.
https://www.instagram.com/reel/ClITc62A0GV/?utm_source=ig_web_copy_link
पंड्याकडे नेतृत्व आल्याने त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्याने या दौऱ्यात उत्तम कामगिरी आणि नेतृत्व केले तर कदाचित त्याच्याकडे भारताच्या पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल. तसेच टी20 विश्वचषक 2024ला अजून दोन वर्ष शिल्लक असल्याने भारतीय क्रिकेट बोर्ड संघबांधणीच्या तयारीसाठी लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे सलामीवीर. आता न्यूझीलंडच्या दौऱ्यात टी20मध्ये कोण सलामीला येणार याबाबतही तर्क वितर्क लावले जात आहेत. Traditional ‘Welcome’ of Team India at Bay Oval Ground, Mount Maunganui; Posts shared by Shreyas Iyer, Kuldeep Yadav
भारत टी20 संघ – शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल कारकिर्दीतील शेवटच्या बॉलवर विकेट घेणारे 3 दिग्गज खेळाडू, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय
चेन्नईने रिलीज केलेल्या खेळाडूने लावली शतकांची रांग, केली किंग कोहलीच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी