---Advertisement---

क्रिकेट विश्वासाठी दु:खद बातमी! सामना खेळत असतानाचा हृद्यविकाराच्या झटक्याने माजी रणजी खेळाडूचा मृत्यू

On: सोमवार, मे 25, 2026 12:28 PM
---Advertisement---

बंगळुरूमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना हृद्यविकाराच्या झटक्याने माजी रणजी खेळाडूचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. माजी रणजीपटू एसएल अक्षय याचे रविवारी (२४ मे) निधन झाले. शिवमोग्गा येथील रहिवासी असलेल्या या ३९ वर्षीय खेळाडूने रणजी ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले होते.

अक्षय कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही खेळला होता, जी आता महाराजा ट्रॉफी केएससीए टी२० म्हणून ओळखली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय केआर पुरम येथील एका मैदानावर तिसऱ्या श्रेणीचा सामना खेळत होता. दुपारच्या या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

अक्षयच्या मृत्यूने कर्नाटक क्रिकेट वर्तुळाला धक्का बसला असून अनेक माजी खेळाडूंनी दु:ख व्यक्त केले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू डोड्डा गणेश यांनी एक्स वर एक भावूक संदेश शेअर केला.

गणेश यांनी त्या पोस्टमध्ये अक्षयचा फोटो शेअर करत लिहिले, “क्रिकेट जगतासाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे. ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज एस. एल. अक्षय, ज्याला मी त्याच्या १९ वर्षांखालील (U19) दिवसांपासून जवळून पाहत होतो, त्याचे आज एका विभागीय सामन्यादरम्यान निधन झाले. माझे दुःख व्यक्त करायला शब्दच नाहीत. २०११/१२ मध्ये कर्नाटककडून चांगल्या यशासह खेळलेला एक मनमिळाऊ खेळाडू आता आपल्यात नाही. अक्षयच्या आत्म्यास शांती लाभो.”

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशननेही एक निवदेन सादर केले आहे. त्यामध्ये लिहिले, ‘अक्षयने प्रथम श्रेणी स्तरावर कर्नाटकचे उत्कृष्टपणे प्रतिनिधित्व केले आणि खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही त्याने अढळ आवड आणि निष्ठेने खेळाची सेवा करणे सुरू ठेवले. कनिष्ठ स्तरीय प्रशिक्षक म्हणून त्याने तरुण क्रिकेटपटूंना घडवण्यात आणि मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---