---Advertisement---

पाहा अंगावर काटे आणणारा ‘कौन प्रवीण तांबे?’ चित्रपटाचा लाजवाब ट्रेलर; राहुल द्रविडचेही फिल्मी दुनियेत पदार्पण

On: शुक्रवार, मार्च 11, 2022 8:03 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून प्रवीण तांबेला ओळखले जाते. तांबेने २०१३ साली वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर नुकताच लॉंच करण्यात आला होता.‌ प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटात त्याची भूमिका निभावत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला असून, त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर क्रिकेटमध्ये यश मिळवणाऱ्या तांबेच्या आयुष्यावरील या चित्रपटात त्याची संपूर्ण कहाणी दाखवण्यात आली आहे.‌ केवळ क्रिकेट आणि क्रिकेट या गोष्टीसाठी जगणाऱ्या प्रवीणच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन खुद्द दिग्गज भारतीय क्रिकेटपटू व विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये द्रविड दिसून येतात. तर, या भूमिकेसाठी श्रेयस तळपदे याचेदेखील कौतुक केले जात आहे. जयप्रद देसाई यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १ एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिजनी हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

DisneyPlus Hotstar Multiplex Kaun Pravin Tambe | Official Trailer | 1st April | DisneyPlus Hotstar

या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे म्हणाला की, प्रवीण तांबे यांची भूमिका साकारणे हे माझे भाग्य आहे. “‘इक्बाल’मध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर १७ वर्षांनी पडद्यावर प्रवीणची भूमिका साकारताना मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अशी भूमिका आणि कथेची संधी एकदाच मिळते. चित्रीकरणाचा प्रत्येक मिनिट मला खूप आवडला,” असे तो म्हणाला.

अशी राहिली कारकीर्द

वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आयपीएल पदार्पण केल्यानंतर त्याला मुंबई संघाकडून रणजी खेळण्याची संधी मिळाली. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद व गुजरात लायन्स संघांचे प्रतिनिधित्व करताना ३३ सामने खेळताना २८ बळी मिळवले होते. तसेच वयाच्या ४८ व्या वर्षी तो कॅरेबियन प्रीमियर लीग खेळणारा पहिला भारतीय बनलेला.

महत्वाच्या बातम्या-

तोडफोड मंडळाचा नवा मेंबर! टीम डेव्हिडचे मुंबई इंडियन्सकडून ‘ढिंच्याक’ स्वागत; पाहा व्हिडिओ (mahasports.in)

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! बेंगलोर कसोटीत १००% चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी (mahasports.in)

रावळपिंडी कसोटीतील खेळपट्टीमूळे पुन्हा पाकिस्तानची नाचक्की; आयसीसीनेही केली कारवाई (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---