लाहोर। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता यजमानांविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेविस हेड याने शतकी खेळी केली.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी प्राथमिकत: चूकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ऍरॉन फिंच (Aaron Finch) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच संघर्ष करायला लावला. या दोघांनी सलामीला शतकी भागीदारी केली. पण, फिंच ३६ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. पण यानंतरही हेडने आपला चांगला खेळ कायम ठेवला.
हेडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्यामुळे त्याने २५ व्या षटकात ७० चेंडूत शतकी खेळी पूर्ण केली. पण याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर इफ्तिखार अहमदने त्याला बाद केले. हेडने या सामन्यात ७२ चेंडूत १०१ धावांची खेळी केली, ज्यात त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. हे त्याचे वनडेतील दुसरे शतक आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून (Pakistan vs Australia) ठोकलेले ट्रेविस हेडचे सर्वात जलद वनडे शतक ठरले आहे, तर ऑस्ट्रेलियाकडून वनडेतील हे एकून ८ व्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक आहे.
हेडने यापूर्वीही पाकिस्तानविरुद्धच पहिले वनडे शतक ठोकले होते. त्याने २०१७ साली ऍडलेड येथे १२८ धावांची खेळी केली होती. याशिवाय हेडने त्याच्या वनडे कारकिर्दीत १० अर्धशतकेही केली आहेत.
ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे कसोटी मालिका
ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका खेळण्यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० असा विजय मिळवला. या मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिले होते. पण तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिका आपल्या नावे केली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे आणि ऑस्ट्रेलियाचा हा पाकिस्तानमधील सलग दुसरा कसोटी मालिका विजय होता. याआधी २४ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिका जिंकली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘एका शब्दानेही RCBने मला विचारलं नाही, असं कुठं असतं का?’ अखेर ‘त्याची’ दुखरी बाजू जगासमोर
“आमच्यासाठी तोच बेबी एबी”, केएल राहुलकडून २२ वर्षीय भारतीय युवा खेळाडूचे कौतुक
‘तेवतिया म्हणजे क्रांती, समोरच्या टीममध्ये अशांती’, मॅचविनरचे कौतुक करताना ‘हा’ दिग्गज बनला कवी