सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही मालिका खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना आज (18 डिसेंबर) सामना ब्रिस्बेन, गाबाच्या मैदानावर खेळला गेला. हा सामना ड्राॅ झाला. तत्पूर्वी या मालिकेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धोकादायक खेळाडू ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणजे ट्रेविस हेड (Travis Head). या डावखुऱ्या फलंदाजाने या मालिकेत 2 शतके झळकावली आहेत.
पण ब्रिस्बेन कसोटीनंतर बातमी आली की, या खेळाडूच्या मांडीला दुखापत झाली आहे आणि (26 डिसेंबर) पासून मेलबर्नमध्ये होणाऱ्या मालिकेतील चौथ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. दरम्यान हेडने स्वतःच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. हेडला गाबा कसोटीत सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 152 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 चौकार लगावले.
सामन्यानंतर ट्रेविस हेड (Travis Head) म्हणाला, “बऱ्याच दिवसांनी अशी फलंदाजी केल्यासारखे वाटते. संघासाठी योगदान देताना मला आनंद होत आहे. या आव्हानात्मक विकेटवर पहिल्या डावात धावा केल्याचा खूप आनंद झाला. मी त्या कठीण प्रसंगाचा चांगल्या प्रकारे सामना केला आणि संघाला मदत केली. मी ज्या गतीने फलंदाजी करतोय ते मला आवडते. स्टीव्ह स्मिथसोबत चांगली फलंदाजी झाली. तोही चांगल्या लयीत असल्याचे दिसत होते. मी मैदानावर येताना वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो.” दुखापतीबाबत बोलताना ट्रेविस हेड (Travis Head) म्हणाला, “थोडीशी सूज आहे ती पुढच्या सामन्यापूर्वी निघून जावी.”
भारताविरूद्ध ‘ट्रेविस हेड’चा (Travis Head) रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने भारताविरूद्धच्या 13 कसोटी सामन्यांच्या 22 डावांत 1,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने भारताविरूद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये 52.71च्या सरासरीने 1,107 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 4 अर्धशतकांसह 3 शतके झळकावली आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून त्याने भारताविरूद्धच्या 30 सामन्यांमध्ये 1,707 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 47.41 आहे. यामध्ये 4 शतके, 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा फिरकीचा जादुगार रविचंद्रन अश्विनची संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द…!
14 वर्षे, 765 विकेट्स…., असं होतं रविचंद्रन अश्विनचं आंतरराष्ट्रीय करिअर!
ब्रेकिंग : आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का, भारताचे खेळाडू रडले