धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कहर केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 27व्या सामन्यात ट्रेविस हेड शतकवीर बनला. यासह त्याच्या नावावर खास पराक्रम गेला. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला 200 धावांच्या जवळ जाता आले.
ट्रेविस हेडचे शतक
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी डेविड वॉर्नर (David Warner) आणि ट्रेविस हेड (Travis Head) मैदानात उतरले होते. वॉर्नर आणि हेडने सुरुवातीपासूनच जबरदस्त फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. दोघांनी विस्फोटक फलंदाजीने संघाला पॉवरप्लेमध्येच 100 धावांचा टप्पा पार करून दिला. यावेळी वॉर्नर (81) शतक करण्यास चुकला. मात्र, हेडने ही संधी गमावली नाही. त्याने या सामन्यात आधी 25 चेंडूत स्पर्धेतील संयुक्त वेगवान अर्धशतकी खेळी केली.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1718155219232776532
विश्वचषकातील तिसरे वेगवान शतक
त्यानंतर त्याने 59 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 6 षटकार आणि तब्बल 10 चौकारांचा समावेश होता. हे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सलग तिसरे शतक ठरले. त्याने या सामन्यात एकूण 67 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 109 धावांचा पाऊस पाडला. यावेळी त्याच्या बॅटमधून 7 षटकार आणि 10 चौकारही निघाले.
विश्वचषक 2023मध्ये वेगवान शतक करण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावर आहे. त्याने 40 चेंडूत नेदरलँड्सविरुद्ध शतक पूर्ण केले. तसेच, यादीत दुसऱ्या स्थानी एडेन मार्करम असून त्याने 49 चेंडूत श्रीलंकेविरुद्ध झंझावाती शतक ठोकले होते. (travis head hit third Fastest Hundred in ODI World Cup 2023)