ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेड भारतासाठी मोठी समस्या बनला होता. त्यानं ॲडलेड कसोटीत 140 धावांची शानदार खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या खेळीसाठी हेडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. मात्र आता गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत ट्रॅव्हिस हेड काहीच करू शकणार नाही. आम्ही असं म्हणत आहोत कारण तेथील त्याची आकडेवारी अतिशय खराब आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा येथे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या कसोटीला शनिवार, 14 डिसेंबरपासून सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी ट्रॅव्हिस हेडची खराब आकडेवारी भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा देऊ शकते.
गाबा येथे खेळलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या शेवटच्या तीन कसोटी डावांवर नजर टाकली तर त्याला येथे खातंही उघडता आलेलं नाही. हेडनं या मैदानावर त्याची शेवटची कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. या कसोटीच्या दोन्ही डावांत तो शून्यावर बाद झाला. यापूर्वी हेडनं या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला होता. याच्या दुसऱ्या डावात त्याला खातं उघडता आलं नव्हतं. हेडचा हा रेकॉर्ड भारतीय संघ आणि चाहत्यांना आनंद देणारा असेल.
2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध गाबा येथे झालेल्या कसोटीत हेडनं 152 धावांची शानदार खेळी खेळली होती. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका कसोटी डावात त्यानं 92 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत भारतीय संघानं त्याला नक्कीच हलक्याच घेऊ नये.
ट्रॅव्हिस हेडनं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 51 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 84 डावांमध्ये त्यानं 43.20 च्या सरासरीनं 3413 धावा केल्या. या कालावधीत त्यानं 8 शतकं आणि 17 अर्धशतकं ठोकली आहेत. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 175 धावा आहे.
हेही वाचा –
गाबाच्या ऐतिहासिक स्टेडियमवर टीम इंडिया शेवटचा सामना खेळणार, जाणून घ्या कारण
पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, एका वर्षात दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती
सूर्यकुमार यादवचं मोठं मन, रहाणेच्या शतकासाठी हा त्याग केला