जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच पहिला दिवस बुधवारी (7 जून) पार पडला. उभय संघांतील हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करावी लागली. मात्र, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड या दोघांच्या योगदानामुळे संघ 300 धावांचा आकडा पार करू शकला. पहिल्या दिवशी नाबाद शतक झळकावलेल्या हेडने दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्याने आपल्याच निवड समितीवर निशाणा साधला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे पहिले तीन फलंदाज 76 धावांवर तंबूत धाडले होते. मात्र, त्यानंतर फलंदाजीला आलेला हेड भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अगदी वनडे स्टाईल फलंदाजी करताना वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने आपल्या आक्रमणाचा वेग वाढवत 106 चेंडूवर या अंतिम सामन्यातील पहिले शतक पूर्ण केले. त्याने दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहत 156 चेंडूत 146 धावा केल्या. यामध्ये 22 चौकार व एका षटकार सामील आहेत.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर बोलताना तो म्हणाला,
“संघातील जागेचा मी फारसा विचार करत नाही. कारण ही गोष्ट आपल्या हातात नसते. कधीतरी आपल्याला वगळले जाणार आहे. मी नेहमीच खेळावर लक्ष केंद्रित करत अधिकाधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. फक्त एक गोष्ट वाटते की, मला जास्त वेळ बाकावर बसावे लागणार नाही. कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा मला पाठिंबा मिळतोय.”
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने 3 विकेट्सच्या नुकसानावर 327 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी एकूण 85 षटकांचा खेळ होऊ शकला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला लवकर बाद करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.
(Travis Head Said Slams Australian Selection Committee Said Hooe They Not Drop Me Anymore)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट