न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट शुक्रवारी (13 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने या सामन्यात दोन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या बांगलादेशला स्वस्तात गुंडालण्यासाठी मदत केली. याचसोबत दिग्गजांच्या यादीत स्वतःचे नाव सामील करून घेतले.
ट्रेंड बोल्ट (Trent Boult) याने बांगलादेविरुद्ध खेळताना 10 षटकांमध्ये 45 धावा खर्च केल्या. लिटन दास आणि तौहिद ह्रदोय यांना त्यांनी तंबूत धाडले. सोबतच वनडे क्रिकेटमध्ये आपल्या 200 विकेट्स देखील पूर्ण केल्या. विशेष म्हणजे बोल्ट वनडे क्रिकेटमध्ये दुसरा सर्वात कमी सामन्यांमध्ये 200 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अवघ्या 107व्या वनडे सामन्यात त्याने 200 विकेट्सचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याने अवघ्या 102 सामन्यांमध्ये 200 वनडे विकेट्स घेतल्या होत्या. स्टार या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. माजी ऑस्ट्रेलिया दिग्गज ब्रेड ली (Brett Lee) या यादीत तुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 112 सामन्यांमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पार केला होता. (Trent Bould completed 200 wickets in ODI cricket)
#StatChat | Trent Boult (107 matches) reaching the milestone when he dismissed Towhid Hridoy in Chennai. Only Mitch Starc (102) and Saqlain Mushtaq (104) have done it faster. Follow play LIVE in NZ against @BCBtigers with @skysportnz. LIVE scoring | https://t.co/aNkBrDiAuv #CWC23 pic.twitter.com/m2QYW21CuI
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 13, 2023
सर्वात कमी सामन्यांमध्ये 200 वनडे विकेट्स घेणारे गोलंदाज
102 – मिचेल स्टार्क
107 – ट्रेंट बोल्ट*
112 – ब्रेट ली
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 50 षटकांच्या या सामन्यात बांगलादेशचे वरच्या फलीतील फलंदाज अपयशी ठरले. मात्र मुस्तफिकूर रहीम आणि कर्णधार शाकिब अल हसन यांच्या 96 धावांच्या भागीदारीमुळे संघ अपेक्षित दावसंख्या गाठू शकला. 9 विकेट्सच्या नुकसानावर बांगलादेश संघाने 245 धावांपर्यंत मजल मारली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (क), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (डब्ल्यू), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
बांगलादेश – लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराझ, शाकिब अल हसन (क), मुशफिकुर रहीम (डब्ल्यू), तौहिद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशची अनुभवी तिकडी चमकली! न्यूझीलंडसमोर विजयासाठी 246 धावांचे आव्हान
BAN vs NZ । शाकिब मुशफिकूरने रचला इतिहासात, शतकी भागीदारी झाली नाही पण…