इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघादरम्यान सध्या तीव कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. यावेळी डॅरिल मिशेल च्या १९० आणि टॉम ब्लंडेलच्या १०६ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ५३३ धावा केल्या. यावेळी न्यूझीलंडकडून ११व्या स्थानी फलंदाजीसाठी आलेल्या ट्रेंड बोल्टने श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या विक्रमाची बरोबरी केली.
ट्रेंट बोल्टने (Trent Boult) पहिल्या डावात १८ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने नाबाद १६ धावांची खेळी केली. यासह त्याने ११व्या क्रमांकावर फलंदाजी करत मुथय्या मुरलीधरनच्या (Muthaiya Murlidharan) विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. या क्रमांकावर फलंदाजी करताना मुरलीधरनने ८७ कसोटीत ६२३ धावा केल्या होत्या, तर बोल्टने ६९ कसोटीत १६.३९ च्या सरासरीने ६२३ धावा केल्या आहेत आणि यादरम्यान त्याने एक अर्धशतकही झळकावले आहे. या सामन्यात त्याला आणखी एकदा फलंदाजीची संधी मिळाली तर तो हा विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकतो.
कसोटीमध्ये ११व्या स्थानावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
६२३ – ट्रेंट बोल्ट
६२३ – मुथय्या मुरलीधरन
६०९ – जेम्स अँडरसन
६०३ – ग्लेन मॅकग्रॉ
५५३ – कर्टनी वॉल्श
दरम्यान, न्यूझीलंडचे फलंदाज डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल यांनी दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना शतकी भागीदारीचे दुहेरी शतकात रूपांतर केल्याने दोन्ही फलंदाजांनी १०० धावांचा टप्पा ओलांडला. जॅक लीचने ब्लंडेलला बाद करून इंग्लंडला पाचवे यश मिळवून दिले, त्यानंतर यजमानांनी आपले पेच घट्ट करण्यास सुरुवात केली. एका बाजूला सतत विकेट पडत होत्या, तर दुसऱ्या टोकाला मिशेल उभा होता. मॅटी पॉट्सने त्याला १९० च्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले आणि न्यूझीलंडचा डाव संपवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने २६ षटकांत एकूण ९० धावा केल्या आणि जॅक क्रॉलीची विकेट गमावली. क्रॉली अवघ्या ४ धावा करून बाद झाला. त्याने ट्रेंट बोल्टला टॉम ब्लंडेलच्या हाती झेलबाद करून इंग्लिश संघाला बॅकफूटवर आणले. आता ऍलेक्स लीस ३४ आणि ओली पोप ५१ धावांवर नाबाद आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिनेश कार्तिक नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल भारतीय संघासाठी सर्वात मोठा गेमचेंजर, माजी कर्णधाराचा दावा
Third T20I: दसुन शनाकाची कर्णधार खेळी, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने चितपट करत राखली लाज