यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) सुपर-१२ फेरीतील ३२ वा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड आणि स्कॉटलॅंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि स्कॉटलॅंड संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. परंतु शेवटी न्यूझीलंड संघाने हा सामना १६ धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात स्कॉटलॅंडच्या फलंदाजाने अप्रतिम शॉट मारल्यानंतर ट्रेंट बोल्टने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलॅंड संघातील फलंदाजांनी देखील अप्रतिम सुरुवात केली होती. दरम्यान दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक मजेशीर घटना घडली, ज्याचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, स्कॉटलॅंड संघाची फलंदाजी सुरू असताना न्यूझीलंड संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी ट्रेंट बोल्ट गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्कॉटलॅंड संघाचा सलामीवीर फलंदाज जॉर्ज मुंसी याने अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह शॉट मारला, जो चार धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर गेला. हा अप्रतिम शॉट पाहून गोलंदाजाला ही रहावलं नाही. त्याने फोटो क्लिक करण्याची रिॲक्शन दिली. हा शॉट मारल्यानंतर फलंदाज ज्या पोझिशनमध्ये आला होता. ती पोझिशन कोणीही आपल्या कॅमेऱ्यात कैद करू पाहेल. त्यामुळेच ट्रेंट बोल्टने अशी रिॲक्शन दिली.
https://www.instagram.com/reel/CV0FJt0lT6b/?utm_medium=copy_link
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, स्कॉटलॅंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड सांगकडून प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ५ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलॅंड संघाकडून माईकेल लिस्कने नाबाद ४२ तर मॅथ्यू क्रॉसने २७ धावांचे योगदान दिले. परंतु स्कॉटलॅंड संघाला हे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आले होते. हा सामना न्यूझीलंड संघाने १६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
“एक,दोन, तीन…”, लाईव्ह पत्रकार परिषदेत रोहितने केले असे काही, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता ‘रुद्रावतार’, मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार
विराटला १५७७ दिवसानंतर समजली अश्विनची ‘किंमत’, त्यानेही १४ धावांवर २ विकेट्स घेत दाखवली ताकद