आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार संपल्यानंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) रोजी पार पडणार आहे. तसेच टी२० मालिका झाल्यानंतर या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, कसोटी मालिकेतून ट्रेंट बोल्टने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ट्रेंट बोल्टने म्हटले की, “टी२० विश्वचषक स्पर्धा हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, पण भारताविरुद्ध भारतामध्ये खेळणे बहुधा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मला वाटते की आमचे खेळाडू त्यासाठी नक्कीच तयार आहेत आणि परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. तिथे खेळपट्टीचा अचूक अंदाज लावणे खूप महत्वाचे आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “प्रत्येक जण न्यूझीलंडमध्ये उन्हाळी हंगाम सुरू होण्याची वाट पाहत आहे. मी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी गेल्या १२ आठवड्यांपासून घरा बाहेर आहे आणि न्यूझीलंडमध्ये उन्हाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी मला फ्रेश व्हायचं आहे.”
तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या पराभवाबाबत बोलताना ट्रेंट बोल्ट म्हणाला की, “हा पराभव पचवणे कठीण आहे. परंतु आयुष्य असच असतं. आम्ही हॉटेलमध्ये गेलो, सामान पॅक केलं, विमानात बसलो, जयपूरला आलो आणि आता हॉटेलमध्ये आहे.”
बोल्ट टी२० विश्वचषकापूर्वी आयपीएल २०२१ स्पर्धेतही मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. आता तो भारताविरुद्धची टी२० मालिका खेळल्यानंतर मायदेशी परतणार आहे.
Finishing up at the @T20WorldCup with a hug from our bus driver Santhosh. Next stop Jaipur! #T20WorldCup #INDvNZ pic.twitter.com/BdHPCHyzrX
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 15, 2021
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केले होते. या पराभवानंतर न्यूझीलंड संघातील खेळाडू चार्टर्ड विमानाने जयपूरला पोहचले आहेत. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन राहावे लागले नव्हते. टी२० मालिकेतील पहिला सामना १७ नोव्हेंबर, तर दुसरा सामना १९ नोव्हेंबर आणि तिसरा सामना २१ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी२० सामन्यासाठी ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
‘आता सध्या जिंकायचंय आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करायचंय’, मुख्य प्रशिक्षक द्रविड झाला व्यक्त