नुकताच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली आणि जेतेपद पटकावले, तर न्यूझीलंड संघाचे स्वप्न अपूर्ण राहून गेले. आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला टी२० सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) पार पडणार आहे.
या मालिकेत युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येऊ शकतात. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी या सामन्यातील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया कशी असू शकते भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यासाठीची ड्रीम ११.
सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिला टी -२० सामना
दिनांक आणि वेळ – बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१. संध्याकाळी ७:०० वाजता.
ठिकाण – सवाई मानसिंग स्टेडियम,जयपूर
अशी असेल दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हेन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर / ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चाहर, आवेश खान, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिशेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), इश सोढ़ी, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने.
अशी असू शकते भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ड्रीम ११ टीम –
यष्टिरक्षक – रिषभ पंत
फलंदाज – रोहित शर्मा, मार्टिन गप्टील, केएल राहुल,ग्लेन फिलिप्स, श्रेयस अय्यर
अष्टपैलू खेळाडू – जेम्स नीशम, व्यंकटेश अय्यर
गोलंदाज – युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, ईश सोढी
कर्णधार – रोहित शर्मा
उपकर्णधार – मार्टिन गप्टील
महत्त्वाच्या बातम्या –
‘आता सध्या जिंकायचंय आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करायचंय’, मुख्य प्रशिक्षक द्रविड झाला व्यक्त
चला हसू! शॉट खेळण्यासाठी फलंदाज पोहोचला पॉईंटच्या फिल्डरजवळ, त्यानंतर जे झाले ते पाहून व्हाल लोटपोट
‘हे एक मोठे आव्हान’, वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य