क्रिकेट हा असा एक खेळ आहे, जिथे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करून संघाला जिंकून देण्याच्या प्रयत्नात असतात. गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून फलंदाजाला बाद करण्याच्या प्रयत्नात असतो, तर फलंदाज त्याच चेंडूवर चौकार किंवा षटकार मारण्याच्या प्रयत्नात असतो. तसेच मैदानावर अनेक मजेशीर घटना देखील घडत असतात, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह टेनिस क्रिकेटचीही क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्रत्येक शहरात टेनिस क्रिकेटच्या मोठ मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.ज्यामध्ये खेळाडू लक्षवेधी कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या नादात त्यांच्याकडून मोठी चूक होते आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होऊ लागतो.
तुम्ही फलंदाजाला अनेक प्रकारे धावबाद होताना पाहिलं असेल. परंतु, अशा प्रकारे धावबाद होताना क्वचितच पाहिलं असेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावत येतो, त्यावेळी गोलंदाजी करताना चेंडू त्याच्या हातून सुटतो.
त्यावेळी चेंडू टप्पा पडून पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूकडे जातो. हा चेंडू ‘डेथ बॉल’ घोषित करता आला असता. परंतु, फलंदाजाला काहीतरी हटके करायचं होत. त्यामुळे तो चेंडूला मारण्यासाठी चक्क पॉइंटच्या खेळाडू पर्यंत पोहोचतो. तरीदेखील चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. त्यावेळी पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो आणि यष्टिरक्षकाकडे धावबाद करण्यासाठी फेकतो. फलंदाज क्रिझमध्ये नसल्याने पंच त्याला बाद घोषित करतात.
https://www.instagram.com/tv/CWV2BaDlxK9/?utm_medium=copy_link
या व्हिडिओवर चाहते देखील मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. तसेच आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने होते. त्यावेळी मोहम्मद हफीज गोलंदाजी करत असताना, त्याच्या हातून चेंडू सुटला होता आणि दोन टप्पा पडून फलंदाजी करत असलेल्या डेविड वॉर्नरकडे गेला होता. त्यावेळी डेविड वॉर्नरने चेंडू पर्यंत पोहचून गगनचुंबी षटकार मारला होता. हा चेंडू ‘नो बॉल’ घोषित करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे एक मोठे आव्हान’, वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य
काय सांगता! ९ वर्षांपुर्वीच रोहितने जयपुरमधेच कर्णधार होण्याच केलं होतं भाष्य, पाहा व्हायरल पोस्ट
रोहितच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड चीत करायला भारतीय संघ उतरणार मैदानात, अशी असू शकते ‘प्लेइंग ११’





