---Advertisement---

बोल्टचे मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन! वाचा 11 महिन्यांनंतर देशासाठी खेळताना गोलंदाजाला काय वाटते

On: गुरूवार, ऑगस्ट 10, 2023 6:00 PM
Trent Boult
---Advertisement---

न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट नुकताच राष्ट्रीय संघासोबत पुन्हा एकदा जोडला गेला आहे. दरम्यानच्या 11 महिन्यात तो न्यूझीलंड संघातून बाहेर होता. संघात आपल्या पुनरागमनाविषयी बोल्टने खास प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय संघात परतल्यानंतर चांगले वाटत आहे आणि खेळण्याची अजून खूप भूक बाकी आहे, असे तो म्हणाला. सोबतच आपल्या कुटुंबामुळे आपण राष्ट्रीय संघासोबतचा करार संपवल्याचेही त्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने न्यूझीलंड क्रिकेट संघ आणि आपली कारकीर्द यांसाठी वेगवेगळे मार्ग निवडले आहेत. मागच्या वर्षी त्याने राष्ट्रीय संघासोबत असणारा करार संपवला. सध्या तो जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळत असून आपल्या कुटुंबालाही वेळ देत आहे. असे असले तरी, आता 11 महिन्यांनंतर पुन्हा एकदा त्याला न्यूझीलंड संघात सामील होण्याची संधी मिळाली आहे. आघामी वनडे विश्वचषक आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात घेतले गेले आहे.

न्यूझीलंड संघात पुनरागमन केल्यानंतर बोल्ट स्वतः देखील उत्सुक आहे. तो म्हणाला, “संघात पुनरागमन करून चांगले वाटत आहे. एक वर्षापूर्वी न्यूझीलंड संघासाठी खेळणे सोडले होते. हा निर्णय कठीण होता. हे न्यूझीलंड क्रिकेट किंवा फ्रँचायझी क्रिकेटबाबत नव्हते. माझी कारकीर्द मोठी आहे, असे मानले. यामुळेच मी कारकिर्दीतील राहिलेला काळ एक चांगला वेगवान गोलंदाज म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मी आधी एक वडील आहे आणि नंतर एक अष्टपैलू खेळाडू आहे. मी नक्कीच आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आधीप्रमाणे उत्सुक आहे. खेळाडूंसोबत येत्या काही महिन्यात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.”

विश्वचषक आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे-टी20 मालिकेत बोल्ड न्यूझीलंड संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. जगभरातील लीगमध्ये खेळल्यानंतर त्याच्याकडे असणारा अनुभव नक्कीच संघातील इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा ठरू शकतो. (Trent Boult will be playing for New Zealand after 11 months and he has given a special reaction about it)

महत्वाच्या बातम्या –
यावर्षी जडेजाने सर्वाधिक वेळा दिली डोपिंग टेस्ट! इतर खेळाडूंबाबत घ्या जाणून
पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची संपत्ती फक्त ‘एवढीच’, आकडा विराटच्या निम्म्या संपत्तीपेक्षाही कमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---