भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकात 276 धावा करून सर्वबाद झाला. मोहम्मद शमी याने या सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. सोबतच काही खास विक्रम देखील नावावर केले. शमीच्या वनडे कारकिर्दीतील हा 93वा सामना होता. या सामन्यात त्याने न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड याचा खास विक्रम मोडीत काढला.
भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 51 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट्स नावावर केल्या. याचसोबत वनडे क्रिकेमधीलत्याच्या विकेट्सची संख्या 170 पर्यंत पोहोचली. 93 वनडे सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत शमी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादीत पहिला क्रमांक ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मिचेल स्टार्क () याचा आहे. स्टार्कने 93 वनडे सामन्यांमध्ये 180 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आहे, ज्याने 93 वनडे सामन्यांमध्ये 169 विकेट्स घेतल्या होत्या.
कारकिर्दीतील 93 वनडे सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
180 – मिचेल स्टार्क
170 – मोहम्मद शमी*
169 – ट्रेटं बोल्ट
164 – ब्रेट ली
156 – मॉर्नी मॉर्कल
155 – ऍलन डोनाल्ड
152 – वकार युनिस
151 – शोएब अख्तर
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही वनडे मालिका तीन सामन्यांची आहे. पहिला सामना शुक्रवारी मोहालीच्या आयएस बिंद्र स्टेडियवर खेळला गेला. मालिकेतील दुसरा सामना 24 आणि 27 सप्टेंबर रोजी आयोजित केला गेला आहे. आघामी वनडे विश्वचषकासाठी दोन्ही संघांच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची आहे. विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. (Trent Boult’s special record was broken by Mohammed Shami)
पहिल्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍडम झम्पा.