इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड जुलै 2023मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाला. ब्रॉडने कारकिर्दीचाला शेवट 604 कसोटी विकेट्सह केला. इंग्लंड संघासाठी त्याचे योगदान कधीच विसरता न येण्यासारखे आहे. याच पार्श्वभूमीवर नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियमध्ये एका महत्वाच्या स्टॅन्डला ब्रॉडचे नाव दिले गेले आहे.
स्टुअर्ट ब्रॉड कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पाचवा सर्वात्तम गोलंदाज राहिला आहे. मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, जेम्स अँडरसन (James Anderson) आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर या यादीत पाचवे नाव ब्रॉडचे येते. काऊंटी क्रिकेटमध्ये नॉटिंघमशायर संघासाठी आणि आंतरराष्ट्रीय वातळीवर इंग्लंडसाठी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) नेहमीच महत्वाचा खेळाडू राहिला. त्याने या दोन्ही संघांसाठी कारकिर्दीत दिलेल्या योगतानेचा मोबदला म्हणून त्याचे नाव ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर कायमचे लागले आहे. स्टेडियमच्या पव्हेलिअन एंडच्या स्टँडला आता स्टुअर्ट ब्रॉड एंड म्हटले जाईल. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिडवर ब्रॉडने 11 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 46 विकेट्स घेतल्या आहेत.
जेम्स अँडरसन (73 विकेट्स) यायच्यानेतर ट्रेंट ब्रिजवर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ब्रॉड पहिला आहे. 2015 साली भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ब्रॉडने 9.3 षटकांमध्ये 15 धावा खर्च करून 8 विकेट्स घेतल्या होत्या. ट्रेंट ब्रिड स्टेडियमवर ब्रॉडचे हे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. ब्रॉडच्या प्रदर्शनाचा विक्रम इतर कोणताही गोलंदाज अद्याप मोडू शकला नाहीये. ब्रॉडचा जन्म नॉटिंघममध्ये जाला असून कारकिर्दीच्या शेवटपर्यंत तो नॉटिंघमशायर (Nottinghamshire) संघासाठी खेळत राहिला.
माध्यमांशी बोलताना ब्रॉड म्हणाला, “नॉटिंघमशायर संघासाठी खेळणे माझ्यासाठी खूप खास आहे. माझी कारकीर्द मला कुठेही घेऊन गेली, तरी नेहमीच माझे गोम ग्राऊंड ट्रेंट ब्रिजवर परत येऊ शकलो. यासाठी मी कृतज्ञ आहे. ज्या मैदानावर मी क्रिकेटच्या प्रेमात पडलो, त्याच मैदानाा एक भाग माझ्या नावाने ओळखला जाणार, हे थोडेसे विश्वास न बसण्यासारखे आहे.”
दरम्यान, ब्रॉडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतीवर एक नजर टाकली, तर त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये इंग्संडसाठी महत्वाची भूमिका पार पाडली. कसोटी क्रिकेटमध्ये 167, वनडे क्रिकेटमध्ये 121 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंडसाठी 56 सामने खेळले. या तिन्ही फॉरमॅटमध्ये ब्रॉडने अनुक्रमे 604, 178, 65 विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ब्रॉडने 265 सामन्यांमध्ये तब्बल 952 विकेट्स घेतल्या आहेत. (Trent Bridge’s pavilion end is renamed as Stuart Broad end)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय खेळपट्टीवर तळपली बाबरची बॅट! सराव सामन्यातच विरोधांना मिळाली चेतावणी
आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजावर, इंग्लंड क्रिकेटसाठी 12 वर्षांत केलंय खास काम