---Advertisement---

सीपीएल २०२०: पोलार्डच्या नाईट रायडर्स संघाची कमाल; नोंदविला सलग ५ वा विजय

On: शनिवार, ऑगस्ट 29, 2020 10:39 PM
---Advertisement---

कायरन पोलार्ड कर्णधार असलेल्या ट्रिनबागो नाइट रायडर्सने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा 7 गडी राखून पराभव केला आणि कॅरिबियन प्रीमियर लीग 2020 चा सलग पाचवा विजय नोंदविला. खॅरी पियरच्या शानदार गोलंदाजीमुळे पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या सामन्यात नाइट रायडर्स विजेता ठरला.

पियरने चार षटकांत केवळ 18 धावा देऊन तीन बळी घेतले. त्यामुळे वॉरियर्स संघ 20 षटकांत 7 बळी गमावून 112 धावा करू शकला. सुरुवातीला 12 धावा देऊन तीन बळी गमावल्यानंतर शिमरॉन हेटमीयर (26), रॉस टेलर (26) आणि केमो पॉल (28) यांच्या डावामुळे वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक धावसंख्या गाठली.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना रायडर्स संघाने अवघ्या 18.2 षटकांत 3 गडी गमावून 115 धावा करून सामना जिंकला. रायडर्सकडून विकेटकीपर फलंदाज टिम सिफर्टने 30 चेंडूत सर्वाधिक 39 धावा केल्या. सिफर्टशिवाय डॅरेन ब्राव्होने नाबाद 26 आणि तियान वेबस्टरने 27 धावा केल्या. वॉरियर्सकडून फिरकीपटू इम्रान ताहिरने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---