---Advertisement---

सुनिल नरेन एक्सप्रेस काही थांबेना, धडाकेबाज कामगिरी करत नाईट रायडर्सला दिला शानदार विजय

On: रविवार, ऑगस्ट 23, 2020 8:07 AM
---Advertisement---

मुंबई । सुनील नरेनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ट्रिबँगो नाईट रायडर्सने जमैका थलाईवाजचा सात विकेट्सने पराभव केला. ट्रिबँगो नाईट रायडर्सने या विजयासह हिरो सीपीएल क्रिकेट लीगमध्ये अव्वल स्थान मिळविले.

या सामन्यात सुनील नरेनने पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या लीगमधील ट्रिबँगो नाईट रायडर्सचा हा दुसरा विजय आहे. या सामन्यात नरेनेने दुसर्‍यांदा सामनावीरचा पुरस्कार जिंकला.

ट्रिनबागोकडून खेळताना नरेनने 4 षटकांत 19 धावा देऊन एक गडी बाद केला. विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात  ट्रिनबागो संघाने आक्रमक सुरुवात केली. सुनील नरेनने 38 चेंडूत दोन षटकार अन् सात चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या तर कॉलिन मुनरोने नाबाद 49 धावांचे योगदान दिले.

दुसर्‍या एका सामन्यात सेंट लुसिया जक्सने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे बार्बाडोस ट्रायडर्सला सात गडी राखून पराभूत केले.

दोन सामन्यांच्या पहिल्या फेरीनंतर ट्रिनबागोने दोन सामने जिंकले तर गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स, जक्स, तल्लाहाहास आणि ट्रायडर्स यांनी प्रत्येकी एक विजय मिळविला. सेंट किट्स आणि पायविस पेट्रियट्स हे दोन्ही सामने गमावले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---