वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथे सोमवारी (24 जुलै) समाप्त झाला. भारतीय संघाकडे हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती. मात्र, अखेरच्या दिवशी सतत पडणारा पाऊस व यामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य न राहिल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. यासह भारतीय संघाने ही मालिका 1-0 अशी खिशात घातली.
हा समजून भारतीय संघाला ही मालिका 2-0 अशा फरकाने खिशात घालण्यासाठी अखेरच्या दिवशी आठ बळींची आवश्यकता होती. भारतीय गोलंदाजी क्रम पाहता भारतीय संघाने हे बळी मिळवण्यासाठी फार वेळ घेतला नसता. मात्र, पाचव्या दिवशी सकाळीच वरून राजाने हजेरी लावल्यामुळे खेळ उशिरा सुरू करण्याचे ठरले. परंतु पावसाचा वेग वाढल्याने व मैदान खेळण्यासाठी योग्य स्थितीत नसल्याचे पंच व सामनाधिकाऱ्यांनी पाहत सामना अनिर्णित घोषित करण्याचा निर्णय घेतला.
डॉमिनिका येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने केवळ तीन दिवसात विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीचे शतक व त्याला साथ देताना रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे पहिल्या डावात 438 पर्यंत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने 255 धावा केल्या. भारतासाठी मोहम्मद सिराज याने सर्वाधिक पाच बळी मिळवले. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात 182 धावा करून डाव घोषित करत वेस्ट इंडिजसमोर 365 धावांचे लक्ष ठेवलेले. मात्र, अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ न होऊ शकल्याने सामना अनिर्णीत राहिला. सिराज याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Trinidad Test Draw Due To Rain India Won Series 1-0)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! त्रिनिदादमध्ये शेवटच्या दिवशी पावसाची हजेरी! वेस्ट इंडीजसाठी चिंतेची बाब
मनिका, नतालियाच्या अविश्वसनीय खेळाने बंगळुरू स्मॅशर्सचे यूटीटीमधील आव्हान कायम