तीन वेळा मानाची महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या विजय चौधरीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रसिद्ध सोशल मीडिया वेबसाइट ट्विटरवर आगमन केले. महाराष्ट्राच्या मातीतील हा गुणवान खेळाडू याचबरोबर सर्व प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर आला आहे. आधीपासूनच फेसबुक आणि इंस्टाग्राम वेबसाइटवर ऍक्टिव असलेलया विजयच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
ट्विटरवर ऍक्टिव असणाऱ्या मराठीतील असंख्य ट्विटर अकाउंटवरून विजयवर शुभेच्छांचा वर्षाव पडला. तसेच क्रीडापत्रकार आणि मान्यवरांनीही विजयला शुभेच्छा दिल्या. देशातील सर्वच मोठे आंतराराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पहिलवान ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया वेबसाइटवर ऍक्टिव्ह आहेत. अगदी दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या सुशीलकुमारपासून ते तीनवेळच्या महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव पर्यंत सर्वजण चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. योगेश्वर दत्तचं ट्विटर अकाउंटतर देशात कायम चर्चेचा विषय असतो.
विजय हा फक्त चौथा महाराष्ट्र केसरी आहे ज्याने ट्विटरवर आपले अकाउंट उघडले आहे. यापूर्वी महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे , डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव हे तिघेच ट्विटरवर होते. सध्या विजयला फेसबुकवर ८ हजार तर इंस्टाग्रामवर २५०० फॉलोवर्स आहेत.