महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव साजरा होत आहे. बाप्पाच्या येण्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार म्हणून तयारीही जोरदार करत असतो. मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषपूर्ण वातावरणात बाप्पाला मखरात बसवलं जातं. त्यातही गणेशोत्सवर म्हटलं की प्रत्येकाला एकदातरी बाप्पाच्या गाण्यांवर ठेका धरावा वाटत असतंच. मग याला खेळाडू तरी अपवाद कसे असतील.
नुकताच ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी यांचा गणेशभक्तीत लीन होऊन नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलीस उपअधीक्षक असलेले विजय चौधरी यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसते की बाप्पाची स्थापना झाल्यानंतर विजय यांनी गणेशमूर्तीला नमस्कार करुन ‘नाद निनादला रे मोरया’ या गाण्यावर ठेका धरला आहे. ते अगदी तल्लीन होऊन नाचताना दिसत आहेत. तसेच यावेळी त्यांच्या अंगावर पोलीस वर्दी दिसत आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विजय यांनी लिहिले आहे की, ‘कामातून वेळ काढत आज गणेश चतुर्थी निमित्त आपल्याकडे गणपती बसवताना वाजत गाजत नाचत बसवला जातो, तर आज नाचण्याचा मोह आवरला गेला नाही आणि गणपती समोर नाचलो. खूप भारी वाटले… आपण सगळे या वर्षी काळजी घेऊ आणि पुढच्या वर्षी नक्की गणेश उत्सव जोरात करू.’
त्यांनी पुढे लिहिले, ‘सगळ्यांनी काळजी घ्या, घरी राहा व घरूनच ऑनलाईन बाप्पांचं दर्शन घ्या. स्वतःला पण करोना पासून वाचवा आणि आपण घेतलेल्या काळजीमुळे आम्ही पोलीस व सर्व गणेश मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी सुरक्षित राहतील! जय हिंद जय महाराष्ट्र!’
https://www.instagram.com/p/CTpTiP3IRju/
विजय चौधरी यांची महाराष्ट्र शासनाने २०१७ साली पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली होती. त्यापूर्वी विजय यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ साली मानाचा ‘महाराष्ट्र केसरी‘ किताब पटकावला आहे. विजय हे जळगाव जिल्ह्यातील सायगावचे असून त्यांचे सध्या वय ३३ वर्षे आहे.
विजय पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल आणि पंजाबमधील धूमछडी आखाडा येथे हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. पुण्यात ते ज्ञानेश्वर मांगडे आणि महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात
महत्त्वाच्या बातम्या –
राज्य कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर
कुस्ती वाचवा! ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा झाल्यास कुस्ती क्षेत्रात नवचैतन्य येईल
“तू का रागावली आहेस?” पंतप्रधान मोदींनी पदकाविना परतलेल्या विनेश फोगटचे केले सांत्वन