काही दिवसांमध्येच भारतात वन डे विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. भारतातील दहा शहरांमध्ये प्रमुख विश्वचषक व दोन शहरांमध्ये सराव सामने खेळले जातील. असे असले तरी भारतातील आणखी बरेच आंतरराष्ट्रीय स्टेडियम या संधीला मुकले आहेत. अशात आता भारतात आणखी एक नवीन सुसज्ज आंतरराष्ट्रीय स्टेडियम तयार होणार आहे. स्टेडियम वाराणसी येथे असेल.
सध्या सोशल मीडियावर वाराणसी येथे होणाऱ्या या स्टेडियमची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. सध्या तरी हा सर्व आराखडा असल्याचे समजते. या स्टेडियमची क्षमता जवळपास 50,000 पेक्षा जास्त असेल. त्याचबरोबर स्टेडियमवर असलेल्या डोमची रचना डमरूप्रमाणे दिसून येईल. तर फ्लड लाइट्स या त्रिशुळाच्या आकारावर बसवण्यात येतील. तर स्टेडियमचे मुख्य प्रवेशद्वार बेलाच्या पानाच्या आकाराचे असेल. तर प्रेक्षक बसण्यासाठी गंगा घाटावरील रचनेप्रमाणे जागा बनवण्यात येईल. याच महिन्याच्या अखेरीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्टेडियमच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल असे सांगण्यात येत आहे. या कामासाठी सहाशे कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित आहे.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत. त्यातील एक स्टेडियम नागपूर येथील ग्रीन फील्ड स्टेडियम असून, दुसरे लखनऊ येथील ईकाना स्टेडियम आहे. त्यानंतर आता हे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारले सध्या केवळ महाराष्ट्रात उपयोगात असणारी तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत. मुंबई येथील वानखेडे स्टेडियम, पुणे येथील एमसीए स्टेडियम तर नागपूर येथील व्हीसीए स्टेडियम यांचा यात समावेश होतो. याव्यतिरिक्त मुंबई येथील डी वाय पाटील स्टेडियम व ब्रेबॉर्न स्टेडियम येथे देखील आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात.
(Trishul, Damru & Belpatra form will be seen in the new cricket stadium in Varanasi)
हेही वाचाच-
सिराजची गरुडझेप! ODI रँकिंगमध्ये ‘एवढ्या’ स्थानांचा फायदा घेत बनला Topper, Asia Cup 2023नंतर मोठा बदल
Dil Jashn Bole: World Cup 2023चे अँथेम साँग रिलीज; रणवीरची हवा, पण गाण्यात नाही एकही क्रिकेटर