इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना साऊदम्प्टन येथे खेळला गेला. पाहुण्या संघाने हा सामना ९० धावांनी जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू ट्रिस्टन स्टब्सला पहिल्या टी-२० प्रमाणे धडाका लावता आला नाही, पण क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने अप्रतिम झेल घेतला. ज्याने हा झेल पाहिला तो थक्क झाला. स्टब्सने चार पावले मागे सरकत हा झेल घेतला. आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या डावाच्या १०व्या षटकात स्टब्सने हा अप्रतिम झेल घेतला. हे षटक ऑफस्पिनर एडन मार्करामने टाकले. मोईन अलीला त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू बाजूला खेळायचा होता, पण चेंडूच्या अतिरिक्त बाऊन्समुळे बॅट काठावर आदळली आणि चेंडू मिड-ऑफच्या दिशेने हवेत गेला. त्यानंतर जे घडले त्यावर विश्वास ठेवणे कोणालाच अवघड आहे. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्टब्सने काही पावले डावीकडे आणि पाठीमागे धाव घेतली आणि चेंडू जमिनीवर आदळण्याआधी, तो जमिनीवर आदळण्यापूर्वी त्याने एका हाताने तो पकडला.
One of the best catches you'll ever see 👏
Scorecard/clips: https://t.co/kgIS4BWSbC
🏴 #ENGvSA 🇿🇦 pic.twitter.com/FBlAOf3HUM
— England Cricket (@englandcricket) July 31, 2022
एका हाताने अप्रतिम झेल
मोईन अलीलाही तो बाद झाल्यावर विश्वास बसत नव्हता. स्टब्सच्या या झेलवर आफ्रिकन संघाने उडी मारून त्याला हवेत उंच केले. स्टब्सचा हा सुपरमॅन अवतार पाहून स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही थक्क झाले. मोईनकडे डगआउटमध्ये परतण्याशिवाय पर्याय नव्हता. हा अष्टपैलू खेळाडू बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला आणि १९२ धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ १६.४ षटकांत १०१ धावांत आटोपला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने तिसरी टी-२० ९० धावांनी जिंकून मालिकाही आपल्या नावे केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विंडीज संघाचा रडीचा डाव! सामना जिंकण्यासाठी बदलले ठिकाण? वाचा खरे कारण
‘त्या’ प्रमुख स्पर्धेत माजी दिग्गजाने ओखळलेली पंतची गुणवत्ता, दिला जुन्या आठवणींना उजाळा
भारतासाठी तिसऱ्या खेळाडूने रचली ‘सुवर्ण’गाथा, जिंकले कॉमनवेल्थ २०२२ मधील सहावे पदक