मेलबर्न येथे सध्या ऑस्ट्रेलियन ओपन 2019 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज(20 जानेवारी) गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला आहे. फेडररला 20 वर्षीय स्टिफानोस सित्सीपासने 6-7(11), 7-6(3), 7-5, 7-6(5) असे चार सेटमध्ये पराभूत करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
3 तास 45 मिनीट चाललेल्या या लढतीत फेडररने पहिला सेट जिंकून चांगली सुरुवात केली होती. तसेच दुसऱ्या सेटमध्येही 4-5 असा फेडरर आघाडीवर होता. परंतू यानंतर सित्सीपासने सामन्यात पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला. त्यानंतर मात्र सित्सीपासने माघार न घेता फेडररला कडवी लढत देत सामनाही जिंकला.
या सामन्यात सित्सीपासने 20 एस आणि त्याचे सर्व 12 ब्रेक पॉइंट्सचा बचाव केला. जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर असणाऱ्या सित्सीपास हा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा पहिला ग्रीक टेनिसपटू ठरला आहे.
या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सित्सीपासला स्पेनच्या रॉबेर्टो बाउतीस्ता अगुतचा सामना करावा लागणार आहे. यावर्षीचा दोहा चॅम्पियन असणाऱ्या अगुतने गतउपविजेता मारीन चिलीचचा 6-7(6), 6-3, 6-2, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
सित्सीपास आणि फेडरर यांच्यात झालेल्या सामन्यात 58 मिनीटे चाललेला पहिला सेट चांगलाच संघर्षपूर्ण झाला. त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. तीन सेट पॉइंट राखल्यानंतर फेडररने चौथ्या सेट पॉइंटला फोरहँडचा फटका मारत हा सेट आपल्या नावावर केला.
फेडररने दुसऱ्या सेटमध्ये सित्सीपासवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण सित्सीपासनेही फेडररचा चांगला प्रतिकार केला. या सेटमध्येही टायब्रेक झाला पण यावेळी सित्सीपासने फेडररवर मात केली.
तिसऱ्या सेटमध्येही हे दोघे एकमेकांचा चांगला प्रतिसाद करत होते. त्यामुळे तिसरा सेटही टाय ब्रेकमध्ये जाणार असे वाटत असतानाच सित्सीपासने हा सेट 7-5 असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. यावेळी फेडररकडून सलग तीन फोरहँडच्या चूका झाल्या.
चौथ्या सेटमध्येही सर्व्हिस दोन्ही खेळाडूंनी राखल्या होत्या. त्यामुळे हा सेटही टायब्रेकमध्ये गेला. या टायब्रेकमध्येही 5-5 अशी बरोबरी झाली होती. पण क्रोस कोर्टवर फोरहँडटचा शॉट मारत सित्सीपासने मॅच पॉइंट मिळवला आणि नंतर टायब्रेक 7-5 असा जिंकत सामनाही जिंकला.
He's done it!@StefTsitsipas knocks out defending champion Roger Federer 6-7(11) 7-6(3) 7-5 7-6(5) to reach his first quarterfinal at a Grand Slam.#AusOpen #AOFiredUp pic.twitter.com/Vz8sQa0AT1
— #AusOpen (@AustralianOpen) January 20, 2019
महत्त्वाच्या बातम्या:
–महाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद
–अजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व