आयसीसीने सोमवारी (१३ जून) आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ (संपूर्ण महिन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा खेळाडू) ठरलेल्या पुरुष आणि महिला खेळाडूंची नावे घोषित केली. मे महिन्यात सर्वत्तम प्रदर्शन करणारा श्रीलंका संघाचा अँजेलो मॅथ्यूजला हा पुरस्कार दिला गेला. महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाची २१ वर्षीय युवा खेळाडू तुबा हसनला मे महिन्याची प्लेअर ऑफ द मंथ निवडले गेले. दोघांनीही हा पुरस्कात जिंकत आपले नाव इतिहासात कोरून ठेवले आहे.
एंजेल मॅथ्यूज (Angelo Mathews) मे महिन्यात आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ ठरल्यामुळे त्याचे नावा इतिहासात कोरले गेले आहे. कारण तो हा पुरस्कार जिंकणारा पहिला श्रीलंकन खेळाडू देखील ठरला आहे. तर दुसरीकडे तुबा हसन (Tuba Hasan) देखील प्लेअर ऑफ द मंथ ठरलेली पाकिस्तनची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी पाकिस्तान संघाच्या तीन खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकला आहे, पण त्यांच्या महिला संघातील कोणत्याच खेळाडूने यापूर्वी हा पुरस्कार जिंकला नव्हता.
नुकत्याच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत एंजेलो मॅथ्यूजने चमकदार कामगिरी केली होती. त्याने या कसोटी मालिकेत १७२ च्या सरासरीने ३४४ धावा केल्या होत्या. मालिकेतील चटंगावमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मॅथ्यूजने १९९, तर मीरपूरमध्ये खेळताना १४५ धावांची खेळी केली होती. पुरस्कार मिळाल्यानंतर मॅथ्यूज म्हणाला की, “मला आयसीसी पुरष प्लेअर ऑफ द मंथ बनल्यामुळे अभिमान आणि आनंद वाटत आहे. मी असिथ फर्नांडो आणि मुशफिकूर रहीम यांनाही त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी शुभेच्छा देतो.”
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या तुबा हसनने नुकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. श्रीलंका संघाविरुद्ध खेळलेल्या ३ टी-२० सामन्यांमध्ये तिचे प्रदर्शन सर्वोत्तम राहिले आणि यासाठी मालिकावीर निवडले गेले होते. तिने या मालिकेत अवघ्या ३.६६ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आणि ५ विकेट्स देखील घेतल्या. या जबरदस्त पदार्पणाचे बक्षीस तिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराच्या रूपातून मिळाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतच्या जागी ‘हा’ खेळाडू संघाचा कर्णधार असता तर भारत आज मालिकेत आघाडीवर असता…
INDvsSA T20: ‘या’ अष्टपैलू खेळाडूच्या जागी रवी बिश्नोईला खेळवा, भारताच्या माजी दिग्गजाचा सल्ला
काही कळायच्या आत डॅनीने करिष्माला उचलून घेतले, अन् ‘ते’ कांड झाले, जाणून घ्याच






