टर्किश फूटबाॅल क्लब गुलस्पोरने टक्क १८ युवा खेळाडूंनी विकून १० शेळ्यांची खरेदी केली आहे. त्यांनी या शेळ्यांची खरेदी लिलावात केली.
यापाठीमागील मुख्य उद्देश म्हणजे या शेळ्यांच्या दुधविक्रीतून पैसा उभा करायचा आणि त्याचा वापर क्लबच्या प्राथमिक गरजांसाठी वापरायचा.
या क्लबचे अध्यक्ष कॅनन बुयुक्लेब्लेबी म्हणाले, आमच्याकडे अजिबात भांडवल राहिले नाही. तसेच आम्हाला सरकार पैसे देत नाही तसेच जे क्लब हे खालच्या गटात खेळतात त्यांना कुणी प्रायोजक मदत करत नाही. त्यामुळे आम्हाला प्राथमिक गरजांसाठी भागवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले.
https://twitter.com/futboldetaycom/status/1029700839445815296?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1029700839445815296&ref_url=https%3A%2F%2Fwww.rt.com%2Fsport%2F436102-turkish-football-club-goats%2F%3Futm_source%3Dinshorts%26utm_medium%3Dreferral%26utm_campaign%3Dfullarticle
“या खरेदीमुळे आमच्याकडे ठराविक रक्कम येईल. तसेच या युवा खेळाडूंसाठी आम्हाला पैशांची गरज आहे.” असेही ते पुढे म्हणाले.
१८ खेळाडूंना विकल्यामुळे या क्लबकडे आता २६०० डाॅलर जमा झाले आहे. तसेच या विक्रीतून ज्या शेळांची खरेदी झाली आहे त्यांच्या दुधविक्रीतून क्लब ८६२ डाॅलरची कमाई होणार आहे. या क्लबने ६ वर्षांनी एकुण १४० शेळ्यांचे लक्ष ठेवले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या: