आयपीएल 2023 मध्ये सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने 12 धावांनी विजय मिळवला. विजय मिळवला असला तरी, या सामन्यात चेन्नईचे वेगवान गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात पाऊल ठेवलेल्या तुषार देशपांडे याने आपल्या पहिल्या षटकात एक नकोसा विक्रमही आपल्या नावे करून घेतला.
चेन्नई आपल्या फलंदाजांच्या शानदार खेळाच्या जोरावर लखनऊविरुद्ध 7 बाद 217 अशी मोठी धावसंख्या उभारली. त्याला प्रत्युत्तर देताना कायले मेयर्स व केएल राहुल यांनी देखील लखनऊला वेगवान सुरुवात दिली. त्यांनी तीन षटकात 33 धावा केल्या होत्या. त्यानंतर डावातील चौथे षटक टाकण्यासाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या तुषार देशपांडे आला. मात्र, हे षटक त्याच्यासाठी विसरण्यासारखे राहिले.
षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने कोणतीही धाव दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर अनुक्रमे एक व दोन धावा निघाल्या. मात्र, त्यानंतर त्याची लय पुरती बिघडली. त्याने सलगपणे नो आणि वाईड चेंडू टाकला. त्यानंतर पुन्हा त्याने अशाच पद्धतीने नो व वाईट चेंडू टाकले. पुढील चेंडूवर एक चौकार वसूल केला गेला. त्यानंतर त्याने पुन्हा एक वाईड चेंडू फेकला. पाचव्या चेंडूवर षटकार व अखेरच्या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकून त्याने षटक समाप्त केले. अशा पद्धतीने त्याने तब्बल 11 चेंडू या षटकात टाकले. आयपील इतिहासातील हे संयुक्तपणे दुसरे सर्वात लांबलचक षटक ठरले.
विशेष म्हणजे यापूर्वी टाकले गेलेले सर्वात लांब षटक 24 तासांपूर्वी मोहम्मद सिराजने टाकलेले. मुंबई इंडियन्स विरुद्ध देखील त्याने आपल्या शतकात 11 चेंडू टाकताना तब्बल 5 वाईड फेकलेले.
(Tushar Deshpande Bowled Joint Longest Over In IPL History Against Lucknow Supergiants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये पुसली जातेय रोहितची ‘हिटमॅन’ ओळख! दोन वर्षापासून ठरलाय ‘सुपरफ्लॉप’
विजयानंतरही आरसीबीचे वाढले टेन्शन! टोप्लीच्या दुखापतीने गोलंदाजी आक्रमण लंगडे? दुखापतग्रस्तांची वाढली यादी