---Advertisement---

पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत टस्कर्स, जॅगवॉर्स संघांचा सलग तिसरा विजय

On: शनिवार, डिसेंबर 18, 2021 5:54 PM
Harshal Gandre of Tuskers playing attacking shot against Bobcats bowler at PYC Garound
---Advertisement---

पुणे| पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2021 स्पर्धेत टस्कर्स जॅगवॉर्स संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ईशान तळवळकर(नाबाद 25 व 1-6) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर वुल्वस संघाने युनिकॉर्न संघाचा 33 धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला. हर्षल गंद्रेच्या नाबाद 35 धावांच्या खेळीच्या जोरावर टस्कर्स संघाने बोबकॅट्स संघावर 7 गडी राखून तिसरा विजय मिळवला.

रवी कासट(1-6 व नाबाद 14धावा) याने केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर जॅगवॉर्स संघाने ओकटोपाय संघाचा 7 गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला. अन्य लढतीत अभिषेक ताम्हाणे(1-8 व नाबाद 44 धावा)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टायगर्स संघाने बोबकॅट्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
वुल्वस: 6षटकात 5बाद 86धावा(कृष्णा मेहता 27(12,4×4,1×6), ईशान तळवळकर नाबाद 25(9,3×4,1×6), रोहित अगरवाल 19(9,2×4,1×6), तन्मय चोभे 2-3, इंद्रजीत कामतेकर 1-15, क्षितीज कोतवाल 1-16) वि.वि.युनिकॉर्न: 6षटकात 4बाद 53 धावा(सिद्धार्थ बदामीकर 26(19,1×4,1×6), अभिषेक जाधवराव नाबाद 12, आकाश जैन 1-6, ईशान तळवळकर 1-6, कृष्णा मेहता 1-11);सामनावीर-ईशान तळवळकर; वुल्वस संघ 33 धावांनी विजयी;

बोबकॅट्स: 6षटकात 7 बाद 59 धावा(रोहित बर्वे 29(12, 4×4,1×6), नील बेलवलकर 20(12,2×4), रणीत जैन 2-6, कल्पक पत्की 1-6, कर्ना मेहता 1-5) पराभूत वि.टस्कर्स: 5.4षटकात 1बाद 63 धावा(हर्षल गंद्रे नाबाद 35(18,3×6), कर्ना मेहता 16(11), कल्पक पत्की नाबाद 10, रोहित बर्वे 1-8);सामनावीर-हर्षल गंद्रे; टस्कर्स संघ 7 गडी राखून विजयी.

लायन्स: 6षटकात 2बाद 51 धावा(चारुदत्त दातार नाबाद 27(15,1×4,2×6), विमल हंसराज 18(13), अर्जुन माहुली 2-10)पराभूत वि.स्कायलार्कस: 5षटकात2 बाद 55 धावा(अंकुश जाधव 20(13), अनुज साबडे नाबाद 17(9,2×4,1×6), विमल हंसराज 2-4);सामनावीर-अर्जुन माहुली; स्कायलार्कस संघ 6 गडी राखून विजयी;

पँथर्स: 6षटकात 7बाद 51 धावा(नहूश जाधव 31(14,2×4,3×6), अमित कुलकर्णी 12, तन्मय चोभे 3-1, अभिषेक जाधवराव 2-8)पराभूत वि.युनिकॉर्न: 5.5षटकात 1बाद 52 धावा(सिद्धार्थ बदामीकर 21(8,1×4,2×6), इंद्रजीत कामतेकर नाबाद 20(17,1×4), आशिष देसाई 1-7);सामनावीर-तन्मय चोभे; युनिकॉर्न संघ 7 गडी राखून विजयी;

बोबकॅट्स: 6षटकात 4बाद 76 धावा(ओजस साबडे 52(22,4×4,4×6), सोहन अनगळ 2-9, अभिषेक ताम्हाणे 1-8) पराभूत वि. टायगर्स: 6षटकात बिनबाद 78 धावा(अभिषेक ताम्हाणे नाबाद 44(19,4×4,3×6), मधुर इंगळहलीकर नाबाद 28(18,1×4,2×6);सामनावीर-अभिषेक ताम्हाणे; टायगर्स संघ 8 गडी राखून विजयी;

ओकटोपाय: 6षटकात 3 बाद 53धावा(समीर 24(18,3×4), विश्वेश कटक्कर 1-12, रवी कासट 1-6)पराभूत वि.जॅगवॉर्स: 3.2षटकात 1बाद 54 धावा(सुधांशु मेडसीकर 21(11,1×4,2×6), रवी कासट नाबाद 14, कुणाल कासट नाबाद 10, गंधार देशपांडे 1-8);सामनावीर-रवी कासट; जॅगवॉर्स संघ 7 गडी राखून विजयी.

महत्त्वाच्या बातम्या – 

ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत आरीव कामत, आदित्य कानडे,शुभांकर बर्वे आघाडीवर

विश्वविजेत्या खेळाडूची निवड समितीवर जहरी टीका; म्हणाला, “यांनी विराटच्या…”

रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार करण्याचा निर्णय ‘या’ ४ कारणांमुळे चुकीचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---