हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हरहुन्नरी अभिनेता दीपेश भानने या जगाचा निरोप घेतला. दीपेश ‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत मलखान सिंगच्या भूमिकेत दिसत होता. या मालिकेशी तो बराच काळ जोडला गेला होता. मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनीत यांनी दीपेश यांच्या निधनाची बातमी दिली. दीपेश यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश शनिवारी सकाळी क्रिकेट खेळत होता. मात्र क्रिकेट खेळत असताना तो अचानक कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सहाय्यक दिग्दर्शक अभिनेतसोबतच अभिनेता वैभव माथूरनेही दीपेश भानच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दीपेश आणि वैभव या मालिकेत मित्रांच्या भूमिकेत होते.
One of my fav star of #BhabhijiGharParHain .. u will b missed 🙏 #deepeshbhan pic.twitter.com/u55NdBO0ik
— Saina Nehwal (@NSaina) July 23, 2022
अनेक मालिकांत केले होते काम
दीपेश बराच काळ टीव्ही जगताशी जोडला गेला होता. ‘भाभीजी घर पर हैं’ पूर्वी तो ‘कॉमेडी का किंग कौन?, ‘कॉमेडी क्लब’, ‘भूतवाला’, ‘एफआयआर’सह अनेक कॉमेडी शोचा भाग होता. याशिवाय त्याने आमिर खानसोबतही काम केले आहे. तो आमिर खानसोबत टी२० विश्वचषकाच्या जाहिरातीत दिसला होता. त्याने २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘फालतू उटपटांग चटपटी कहानी’ या चित्रपटात काम केले होते.
दीपेश याच्या निधनानंतर टेलिव्हिजनसृष्टीतून अनेकांनी आपला शोक व्यक्त केला. एफआयआर मालिकेत दीपेश याच्यासोबत काम केलेली कविता कौशिक, तहसीन पूनावाला तसेच ऑलम्पिक पदक विजेते बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी देखील त्याला श्रद्धांजली अर्पण केली.
महत्त्वाच्या बातम्या-
WIvIND: काट्याच्या लढतीत टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा; वेस्ट इंडिज अवघ्या ३ धावांनी पराभूत
वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल
ही कसली व्यथा! कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघ सज्ज, पण व्हिसा वाढवतंय टेन्शन