---Advertisement---

लाडक्या आर्यनने केली बाप शाहरुखला आयपीएल लिलावात खेळाडू खरेदी करताना मदत

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 4:40 PM
---Advertisement---

चेन्नईमध्ये आयपीएलच्या २०२१ च्या लिलावाला सुरुवात झाली आहे. अनेक नवीन आणि युवा खेळाडू या लीलवात सहभागी झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सह मालक आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा सुपुत्र आर्यन खान याचा देखील सहभाग आयपीएलच्या लिलावात पाहायला मिळाला आहे. आर्यन खान आणि जूही चावलाची सुपुत्री जान्हवी चावला या दोघांनी पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावात सहभाग नोंदवला आहे. परंतू हे येथे खेळाडू म्हणून नाही तर संघमालक म्हणून आले होते. त्यांच्यासोबत केकेआर संघाचे सीईओ वेंकी मैसूर, जय मेहता आणि संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर देखील उपस्थित होते.

आर्यन खानबद्दल म्हणायचे झाले तर, तो सुरुवाती पासूनच केकेआर संघाचा समर्थक आहे. गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत देखील तो पिता शाहरुख खान सोबत मैदानात सामना पाहण्यासाठी उपस्थित होता. तसेच केकेआर संघाचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी तो स्टेडियममध्ये आपली हजेरी लावत असतो. अशातच लिलावाच्या वेळी शेअर करण्यात आलेल्या फोटोत तो पहिल्यांदाच लिलावात उपस्थित असल्याचे दिसून येत आहे.

आयपीएलच्या ट्विटर हँडेलवर शेअर केला फोटो

आर्यन खान आणि जान्हवी चावलाचा लिलावाच्या ठिकाणाचा फोटो ट्विटरवर भरपूर शेअर केला जात आहे.यावर चाहते आपली प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, आर्यन खानचे आयपीएल लिलावात पदार्पण झाले.

https://twitter.com/mratun_ks/status/1362339380426203138

https://twitter.com/SRKxCombatant/status/1362089317212987394

कोलकाता संघाकडे १०.७५ करोड रुपये शिल्लक

कोलकता नाईट रायडर्स संघाने ऑयन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नीतिश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरेन, पैट कमिंस, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, अली खान, टिम सिफर्ट या खेळाडूंना रिटेन केले होते. तर निखिल नायक, सिद्धेश लाड, एम सिद्धार्थ, टॉम बैंटन, क्रिस ग्रीन, हैरी गुर्ने.या खेळाडूंना केकेआर संघातर्फे रिलीज करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-
ख्रिस माॅरिस ठरला आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू, या संघाने लावली १६.२५ कोटींची बोली
मार्केटमध्ये मॅक्स भाऊचा दरारा कायम.! मॅक्सवेलवर १४.२५ कोटींची विक्रमी बोली, या संघाने घेतले ताफ्यात
आयपीएल लिलाव : मुंबईकर शिवम दुबेवर या संघाने लावली ४ कोटी ४० लाखांची बोली

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---