---Advertisement---

आयपीएल लिलाव : ‘मुंबईकर’ शिवम दुबेवर ‘या’ संघाने लावली ४ कोटी ४० लाखांची बोली

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 3:58 PM
---Advertisement---

चेन्नई। गुरुवारी (१८ फेब्रुवारी) इंडियन प्रीमीयर लीगच्या २०२१ हंगामाचा म्हणजे आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावात २९२ खेळाडूंचा समावेश होता. यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेचाही समावेश होता. त्याला यंदा मोठी बोली लागली आहे.

या लिलावात दुबेवर अनेक संघांनी पसंती दाखवली होती. तरी त्याला संघात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये चूरस दिसली. अखेर त्याला राजस्थान रॉयल्सने ४ कोटी ४० लाख रुपयांना खरेदी करत आपल्या संघात सामील केले.

शिवमला या लिलावाआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुक्त केले होते. तो आत्तापर्यंत आयपीएलमध्ये  २०१९ आणि २०२० सालचा हंगामात खेळला आहे. यात त्याने १५ सामन्यात १६९ धावा केल्या असून ४ विकेट्स घेतल्या आहेत.

शिवम दुबेचे आंतरराष्ट्रीय कारकिर्द-
गोलंदाजी ऑलराऊंडर असलेल्या शिवमने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १ वनडे व १२ टी२० सामने खेळले आहे. वनडेत त्याने केवळ ९ धावा केल्या असून टी२० कारकिर्दीत १०५ धावा व ५ विकेट्स घेतल्या आहेत. १६ प्रथम श्रेणी सामने, ३७ अ दर्जाचे सामने व ५५ ट्वेंटी ट्वेंटी सामने शिवमने खेळले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---