भारतीय संघासाठी रविवारचा (दि. 3 डिसेंबर) दिवस खूपच खास ठरला. 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह सूर्यकुमार यादव याच्या संघाने 5 सामन्यांची टी20 मालिका 4-1ने खिशात घातली. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 161 धावांचे आव्हान दिले होते, ज्याचा पाठलाग करताना मॅथ्यू वेडची सेना 8 विकेट्स गमावत फक्त 154 धावाच करू शकली. त्यामुळे हा सामना भारताने 6 धावांनी नावावर केला. या सामन्याचा शिल्पकार अर्शदीप सिंग ठरला. त्याने अखेरच्या षटकात शानदार गोलंदाजी केल्यामुळे ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर (53) आणि जितेश शर्मा (24) यांच्या खास खेळीच्या जोरावर 8 विकेट्स गमावत 160 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने बेन मॅकडर्मोट (54) याच्या अर्धशतकाच्या आणि कर्णधार मॅथ्यू वेड याच्या 22 धावांच्या जोरावर आव्हानाचा जवळ पोहोचला. एकेवेळी असे वाटत होते की, पाहुणा संघ हे आव्हान सहजरीत्या पार करेल. अखेरच्या षटकात त्यांना विजयासाठी 10 धावांची गरज होती.
यावेळी भारताकडून अखेरचे षटक अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने टाकले. त्याने 3 धावा खर्च करत वेडची महत्त्वपूर्ण विकेटही घेतली. तसेच, विजय भारताच्या पारड्यात टाकला. यानंतर भारतीय संघाच्या रोमांचक विजय आणि अर्शदीपच्या खतरनाक गोलंदाजीविषयी ट्विटर प्रतिक्रिया (Arshdeep Singh Twitter Reactions) येत आहेत.
एका युजरने म्हटले की, “अर्शदीप सिंगने वेडविरुद्ध अखेरच्या षटकात 10 धावांचा बचाव केला. भारावून टाकणारी गोलंदाजी.”
Arshdeep Singh defended 10 runs in the last over against wade. Mind-blowing bowling 🔥#CncSportX #ArshdeepSingh pic.twitter.com/AlLA8ZZTe3
— CNC SportX (@CncSportX) December 3, 2023
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “डेथ ओव्हर्समध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांच्या गोलंदाजीत खूप जास्त अंतर आहे.”
Difference between prasidh krishna and Arshdeep Singh in death overs is huge!!! #IndvsAus
— Sport in a nutshell (@Shuvo10976159) December 3, 2023
आणखी एकाने लिहिले की, “अर्शदीप सिंग द हिरो.”
https://twitter.com/PariharNemraj/status/1731359290240446970?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1731359290240446970%7Ctwgr%5Eb93ada9fa632b8a95e792acebfaedf6a138b1437%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Ftwitter-lauds-arshdeep-singh-for-his-match-winning-last-over-against-australia-in-5th-t20i-ind-vs-aus
एक युजर असेही म्हणाला की, “अर्शदीप सिंगचे अखेरचे शानदार षटक. त्याने शेवटच्या 6 चेंडूत 10 धावांचा बचाव केला. त्याने शानदार गोलंदाजी केली आणि भारताला सामना जिंकून दिला.”
Top class last over by arshdeep singh. He defended 10 runs off the last six balls and he did it brilliantly and won the game for India.#INDVSAUS
— CricSubho (@SubhoMajumdar3) December 3, 2023
ऑस्ट्रेलियाविषयी बोलताना एका युजरने लिहिले की, “शेवटी कांगारूंशी बदला घेतला गेला.”
Finally revenge taken from kangaroo 🦘😂#INDvsAUS pic.twitter.com/wmlNtcEOjp
— Urooj Arif (@UroojArifkhan) December 3, 2023
अर्शदीपचे कौतुक करत एकाने लिहिले की, “अर्शदीप सिंग, तू भारताच्या विजयाचा हिरो आहेस. त्याने किती आत्मविश्वासाने अखेरचे षटक टाकले. यामध्ये तो दबावात होता आणि फक्त 3 धावा खर्च केल्या.”
Arshdeep Singh, You are the hero of the night for Team India. 🇮🇳🫡🔥
What an incredible last over bowled by him giving just 3 runs that too under pressure. 🌟💙
Well bowled 👏 @arshdeepsinghh #ArshdeepSingh #INDvAUS #INDvsAUS pic.twitter.com/G1TGBzKEmM
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) December 3, 2023
एक युजर ट्वीट करत असे म्हणाला की, “अर्शदीप अंतिम ओव्हर स्पेशलिस्ट.”
Arshdeep the final over specialist!
— Yashasvi Shailly (@yashasvishailly) December 3, 2023
अर्शदीपची गोलंदाजी
अर्शदीप सिंग याने या सामन्यात एकूण 4 षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक 40 धावा खर्च केल्या. मात्र, यावेळी त्याने महत्त्वाच्या 2 विकेट्सही नावावर केल्या. वेडची विकेट घेण्यापूर्वी त्याने अर्धशतकवीर बेन मॅकडर्मोट याला तंबूत पाठवलं होतं. (twitter reaction after arshdeep singh for his match winning last over against australia in 5th t20i ind vs aus)
हेही वाचा-
शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांचा बचाव करणाऱ्या अर्शदीप सिंगचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘सूर्या म्हणालेला…’
मालिका खिशात घालताच गगनात मावेनासा झाला सूर्याचा आनंद, म्हणाला, ‘आम्हाला निर्भीडच व्हायचं होतं…’