---Advertisement---

IPL2021: चेन्नईने सलग पाचवा विजय मिळवताच सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस, पाहा काही खास प्रतिक्रिया

On: गुरूवार, एप्रिल 29, 2021 2:10 AM
---Advertisement---

दिल्ली। चेन्नई सुपर किंग्सने बुधवारी(२८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २३ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईचा हा या हंगामातील ५ वा विजय ठरला. तर हैदराबादचा हा या हंगामातील ५ वा पराभव ठरला. या सामन्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

चेन्नई गुणतालिकेत अव्वल 
चेन्नईने या हंगामात पहिल्या ६ सामन्यांनंतर ५ सामने जिंकून १० गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. तसेच सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचेही ६ सामन्यांतील ५ विजयांसह १० गुण आहेत. मात्र, चेन्नईचा नेट रनरेट बेंगलोरपेक्षा अधिक असल्याने बेंगलोर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पहिला सामना पराभूत झाल्यानंतर सलग ५ विजय मिळवले आहेत.

विशेष म्हणजे चेन्नईसाठी पाच महिन्यांपूर्वी युएईमध्ये पार पडलेला १३ वा आयपीएल हंगाम खराब ठरला होता. आयपीएल २०२० मध्ये चेन्नईने चौदा सामने खेळले. यामध्ये या संघाने केवळ ६ सामन्यात विजय मिळवला, तर ८ सामन्यात या संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे त्यांना गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच त्यांना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते.

असे असतानाही केवळ ५ महिन्यात मागील हंगामातील खराब कामगिरी विसरत चेन्नईने १४ व्या आयपीएल हंगामात केलेले दमदार पुनरागमन पाहून अनेकांनी या संघाचे कौतुक केले आहे. याबद्दल देखील ट्विटरवर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच यंदाच्या हंगामात गुणतालिकेतील पहिल्या २ क्रमांकासाठी चेन्नई आणि बेंगलोरमध्ये आत्तापर्यंत दिसलेल्या शर्यतीबद्दलही अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

https://twitter.com/rpsingh/status/1387459564547760128

https://twitter.com/bhogleharsha/status/1387447709007716352

https://twitter.com/ThePavithraOff/status/1387464936528384000

https://twitter.com/msdian_abhi/status/1387461714069778433

चेन्नईने मिळवला हैदराबादविरुद्ध ७ विकेट्सने विजय 
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १८.३ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला. चेन्नईकडून सलामीला फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडने १२९ धावांची भागीदारी करत विजयाचा भक्कम पाया रचला.

फाफ डू प्लेसिसने ३८ चेंडूत ५६ धावा केल्या. या खेळीत फाफ डू प्लेसिसने ६ चौकार आणि १ षटकार मारला. तसेच ऋतुराजने ४४ चेंडूत १२ चौकारांसह ७५ धावा केल्या. त्यांच्यानंतर अखेर सुरेश रैना आणि रविंद्र जडेजाने उर्वरित आव्हान पूर्ण करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जडेजा ७ धावांवर नाबाद राहिला. तसेच मोईन अलीने १५ धावांचे योगदान दिले.

हैदराबादकडून केवळ राशिद खानलाच विकेट्स घेण्यात यश आले. चेन्नईच्या सर्व ३ विकेट्स त्यानेच घेतल्या.

तत्पूर्वी, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १७१ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने अर्धशतकी खेळी केली. पांडेने ४६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ६१ धावांची खेळी केली. तर वॉर्नरने ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्या. तसेच केन विलियम्सनने १० चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी केली. तर केदार जाधवने ४ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या.

चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर सॅम करनने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये वॉर्नरने ‘हा’ विक्रम करत मिळवले गेल, डिविलियर्स, पोलार्ड या परदेशी खेळाडूंच्या पंक्तीत जागा

लाजवाब! फाफ डू प्लेसिसने हवेत उडी मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ

आरपी सिंगने सोडला आयपीएलचा बायोबबल, धक्कादायक कारण आले समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---