सध्या संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरातील परिस्थिती गंभीर असली तरी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा १४ वा हंगाम हा सुरु आहे. काही विदेशी खेळाडूंनी स्पर्धेच्या मध्यातूनच माघार घेतल्यानंतर आता या स्पर्धेदरम्यान समालोचन करणाऱ्या एका माजी भारतीय खेळाडूने देखील आयपीएल सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
हा खेळाडू परतला घरी
जगातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स समूहाकडून केले जात आहे. त्याच्या हिंदी समालोचन गटाचा भाग असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग हा आयपीएल अर्ध्यात सोडून आपल्या घरी परतला आहे.
आरपी सिंगच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी व कुटुंबासोबत राहण्यासाठी आरपी सिंगने समालोचकांच्या बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वडिलांची तब्येत ठीक झाल्यानंतर तो पुन्हा परतणार का? याविषयी काही माहिती देण्यात आली नाही.
खेळाडूंनी अर्ध्यात सोडले आयपीएल
भारतात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्यामुळे काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाय याने कोरोनापेक्षा आयपीएलला जास्त महत्त्व दिले जात असल्या कारणाने आयपीएलमधून नाव मागे घेतले. तर, आरसीबीसाठी खेळणाऱ्या ॲडम झम्पा व केन रिचर्डसन यांनीदेखील कोरोनाचे कारण सांगत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.
राजस्थान रॉयल्सचा सहभाग असणाऱ्या लियाम लिव्हींगस्टोनने बायो बबलला कंटाळून आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने देखील कुटुंबासोबत राहण्यासाठी स्पर्धेतून नाव माघारी घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! डेव्हिड वॉर्नर टी२० क्रिकेट इतिहासात असा कारनामा करणारा जगातील चौथाच क्रिकेटपटू
वॉर्नरचा मोठा विक्रम! संथ अर्धशतकानंतरही आयपीएल इतिहासात ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिला क्रिकेटर
बापाची वेडी माया! सीएसकेविरुद्धच्या सामन्यात लेकींच्या प्रेमापोटी केलं असं काही, पाहून कराल ‘सलाम’






