---Advertisement---

वेदनादायक सुरुवात! धोनीला शुन्यावर बाद झाल्याचे पाहून सोशल मीडियावर पडला प्रतिक्रियांचा पाऊस

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (१० एप्रिल) सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला छाप पाडता आली नाही. तो शुन्य धावेवर बाद झाला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाकडून धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, त्याला भोपळा पण फोडता आला नाही. तो केवळ दुसराच चेंडू खेळताना आवेश खानाविरुद्ध त्रिफळाचीत झाला.

विशेष म्हणजे धोनीने शुन्यावर बाद होण्याची घटना आयपीएलमध्ये तब्बल ६ वर्षांनी आणि १०८ डाव त्याने खेळल्यानंतर घडली आहे.  यापूर्वी धोनी आयपीएलमध्ये शेवटचे २०१५ सालच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध शुन्यावर बाद झाला होता. तसेच धोनीची आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. तो २०१५ पूर्वी २०१० सालच्या हंगामात दोनवेळा शुन्यावर बाद झाला होता.

सोशल मीडियावर धोनी ट्रेंड

धोनी शुन्यावर बाद झाल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेक मीम्सही व्हायरल झाले. धोनीने मागीलवर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे जवळपास ५ महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरलेला धोनी पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला.

त्यामुळे एका चाहत्याने ट्विट करत म्हटले आहे की ‘६ वर्षांनी धोनी शुन्यावर बाद, वेदनादायक सुरुवात.’ तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘मी आतुन मेलो आहे’अशा अर्थाचे वाक्य लिहिलेले गमतीशीर मीम शेअर करत ट्विट केले आहे की ‘एमएस धोनीला शुन्यावर बाद झालेले आणि चेन्नईला पराभूत झालेले पाहून त्यांचे चाहत्यांची मनस्थिती’. असे अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

https://twitter.com/KyaYaarShree/status/1381153082969518084

या सामन्यात धोनी जरी शुन्यावर बाद झाला तरी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांच्याकडून सुरेश रैना याने ताबडतोड ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यासोबतच मोईन अली याने ३६ तर रायुडूने २३ आणि जडेजाने २६ धावांची खेळी केली. यासोबतच करनने शेवटी येऊन ३४ धावांची आक्रमक खेळी केली.

दिल्लीचा विजय

प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शॉ आणि शिखर धवन यांनी १३८ धावांची सलामी भागीदारी रचली. शिखर धवन याने ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी केली तर पृथ्वी शॉ याने अवघ्या ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्यांच्या या भागीदारीनंतर रिषभ पंतने नाबाद १५ आणि मार्कस स्टॉयनिसने १४ धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ आणि ड्वेन ब्रावोने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

जमाईका टू इंडिया! आयपीएलदरम्यान ख्रिस गेलचे रॅप साँग झाले प्रदर्शित, इंटरनेटवर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

हे आहेत सनरायझर्सचे ‘जबरा फॅन’, वॉर्नरने शेअर केली छायाचित्रे

जेव्हा २५ वर्षांपूर्वी वेंकटेश प्रसाद पाकिस्तानी क्रिकेटरला म्हटला होता ‘मी इंदिरानगरचा गुंडा आहे’, ट्विट होतय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---