---Advertisement---

जेव्हा २५ वर्षांपूर्वी वेंकटेश प्रसाद पाकिस्तानी क्रिकेटरला म्हटला होता ‘मी इंदिरानगरचा गुंडा आहे’, ट्विट होतय व्हायरल

On: रविवार, एप्रिल 11, 2021 6:16 PM
---Advertisement---

मागील काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये नेहमीच शांत दिसणारा द्रविड रस्त्यावरील ट्रॅफिक पाहून चिडलेला दिसत होता. तसेच तो चिडून ‘मी इंदिरानगरचा गुंडा आहे’, असे म्हणतानाही दिसत आहे. या व्हिडिओवर आजी-माजी क्रिकेटपटूंकडूनही विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. आता भारताचा वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादनेही या व्हिडिओच्या संदर्भ लक्षात घेत १९९६ सालच्या विश्वचषकाचे एक मजेदार ट्विट केले आहे.

साल १९९६ च्या विश्वचषकातील दुसर्‍या पात्रता गटात भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांविरूद्ध मैदानात उतरला होता. हा सामना वेंकटेश प्रसाद आणि पाकिस्तानचा फलंदाज अमीर सोहेल यांच्या झालेल्या चकमकीमुळे प्रसिद्ध आहे. या सामन्यात पाकिस्तानकडून अर्धशतकी खेळी करणाऱ्या सोहेलने प्रसादने टाकलेल्या १४ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर चौकार ठोकत त्याला पुढच्या चेंडूवरही असाच चौकार मारणार अशा अर्थाचे हातवारे केले होते. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रसादने सोहेलचा त्रिफळा उडवत त्याला बाद केले होते.

याच घटनेचे फोटो प्रसादने नुकतेच ट्विटरला शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सोहेल प्रसादच्या दिशेने काही हातवारे करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये सोहेल त्रिफळाचीत झाला आहे. या फोटोंना कॅप्शन देताना प्रसादने लिहिले आहे की ‘ १४.५ षटकात मी सोहेलला म्हणालो, मी इंदिरानगरचा गुंडा आहे.’ प्रसादचे हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रसादच्या ट्विटवर भाष्य करताना पाकिस्तानच्या एका पत्रकाराने लिहिले की, प्रसादच्या कारकीर्दीतील ही एकमेव मिळकत आहे. त्यावर प्रसादने त्याला प्रतिउत्तर देत म्हटले आहे की ‘नाही नजीब भाई, काही चांगल्या कामगिरी पुढे मांडल्या आहेत. १९९९ या वर्षच्या इंग्लंडमधील विश्वचषकात मॅनचेस्टरमध्ये पाकिस्तानविरुद्ध २७ धावांच्या बदल्यात पाच बळी घेतले होते. त्यावेळी पाकिस्तानला २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता आला नव्हता.’

प्रसादने त्याच्या कारकिर्दीत ३३ कसोटी आणि १६१ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी अनुक्रमे ९६ आणि १९६ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

केकेआर विरुद्ध हैदराबाद: कोण ठरणार वरचढ? पाहा दोन्ही संघांची ‘ही’ आकडेवारी

सीएसकेच्या काळजीत भर, ‘हे’ २ खेळाडू आगामी सामन्यास मुकणार; प्रशिक्षकांनी दिली माहिती

‘ ..तर माझी पत्नी मला घटस्फोट देईल’, पाँटिंगने सांगितले अजब कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---