---Advertisement---

‘ ..तर माझी पत्नी मला घटस्फोट देईल’, पाँटिंगने सांगितले अजब कारण

On: रविवार, एप्रिल 11, 2021 4:44 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आहे. तीन वर्षांपूर्वी दिल्ली संघाशी जोडले गेल्यानंतर संघाच्या कामगिरीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. २०२० मध्ये दिल्लीने प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चौदाव्या हंगामाची सुरुवात देखील दमदार झाली आहे. त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तीन वेळाचा विजेता चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून मोहिमेची सुरूवात केली. त्याचवेळी रिकी पाँटिंगचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आयपीएलचा कबीर खान
सन २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चक दे’ चित्रपटात शाहरुख खानने भारताच्या महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक कबीर खान ही भूमिका निभावली होती. चित्रपटात प्रशिक्षक कबीर खान दाढी राखत आणि आपल्या खास शैलीत संघाचे मनोबल वाढवत असत. पाँटिंगचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ‘आयपीएलचा कबीर खान’ म्हणून ओळखले जाऊ लागलेय. दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रिकी पाँटिंड खुलेपणाने बोलत आहेत.

…तर माझी पत्नी मला घटस्फोट देईल
या व्हिडीओमध्ये जेव्हा पॉंटिंगला कबीर खानसारखी दाढी राखणार का? असे विचारले असता पाँटिंगने सरळ नकार दिला. तो म्हणाला की, “हा एक विधी आहे, जो तो प्रत्येक खेळाडू सामन्यापूर्वी करतो. प्रत्येक सामन्यापूर्वी खेळाडू क्लीन शेव असतात.”

विनोदाने, पाँटिंग असेही म्हटला की, “पत्नीने जर मला असे पाहिले तर कदाचित ती घटस्फोट देईल. पुढील दोन दिवसांत मी शेव करेन. तुमच्या लक्षात आले आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु मी प्रत्येक सामान्याच्या आधी रात्री शेव करतो.”

दिल्लीचा यशस्वी प्रशिक्षक बनला पाँटिंग
रिकी पाँटिंगने २०१८ मध्ये प्रथम दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा स्वीकार केला. पुढच्याच वर्षी दिल्ली तब्बल सात वर्षांनंतर प्ले ऑफसाठी पात्र ठरली. २०२० मध्ये एक पाऊल पुढे जात संघाने अंतिम फेरीत मजल मारली. यावर्षी देखील दिल्ली कॅपिटल्सकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने या हंगामात युवा यष्टीरक्षक रिषभ पंत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: भर सामन्यात जडेजाने दिल्लीच्या गोलंदाजाला घातली धसकी, डोळे मोठे करत दाखवली भिती!

SRHvKKR: सामन्यापुर्वी वातावरण तापलं! राशिद खान अन् केकेआरच्या खेळाडूच्या पत्नीमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगच्या स्थगित हंगामास ‘या’ दिवशी पुन्हा होणार सुरुवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---