---Advertisement---

SRHvKKR: सामन्यापुर्वी वातावरण तापलं! राशिद खान अन् केकेआरच्या खेळाडूच्या पत्नीमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

On: रविवार, एप्रिल 11, 2021 4:31 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने असणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्हीही संघांनी कसून सराव केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच हा सामना सुरू होण्यापूर्वी राशिद खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यावर स्पोर्ट्स प्रेझेंटरने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत प्लेऑफ मध्ये स्थान मिळवण्यास अपयश आले होते. तर सनरायझर्स हैदराबाद संघाने गेल्या ४ हंगामापासून आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. यंदा हे दोन्हीही संघ विजेतेपद मिळवण्यासाठी कसून सराव करताना दिसून येत आहे.

अशातच तिसऱ्या सामन्यापूर्वी हैदराबाद संघाचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता ज्यावर त्याने “सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे”, असे कॅप्शन दिले होते. या फोटोवर स्पोर्ट्स प्रेजेंटर आणि बेन कटिंगची पत्नी एरविन हॉलंड हिने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “माफ करा पण मी या वेळेस कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत आहे.” पुढे तिने हसायचा इमोजी देखील टाकल्या आहेत.

यांनतर राशिदने “नाही” असे लिहून पुढे हसण्याच्या इमोजी देखील टाकल्या आहेत.

आयपीएल २०२१ हंगामासाठी हॉलंडचा नवरा असलेला बेन कटिंग कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे.

Screemgrab: Instagram/Rashid Khan

यापूर्वी झाले आहे मजेशीर संभाषण

हॉलंड आणि राशिदमध्ये सोशल मीडियावर मजेशीर संभाषण होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील २०१८ साली अफगाणिस्तान प्रीमीयर लीग दरम्यान हॉलंडने राशिदला म्हटले होते की कटिंगविरुद्ध फार गोलंदाजी करु नकोस. त्यावर राशिद गमतीने म्हणाला होता, की तो त्याला जास्त चेंडू टाकणार नाही, पण कटिंगला समजावून सांग की त्यानेही राशिदविरुद्ध स्वीप शॉट मारु नये.

महत्त्वाच्या बातम्या –

KKRच्या कर्णधाराचा मोठा डावपेच, गतवर्षी फ्लॉप ठरलेल्या ‘या’ खेळाडूला पहिल्याच सामन्यात उतरवणार मैदानात!

Video: ‘हा’ बडा खेळाडू वास्तवात बनलाय द्रविडच्या भयंकर रागाचा शिकार, विरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

विजयाच्या जल्लोषात दुखापतीची चिंता; दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ स्टार क्रिकेटपटू जखमी, दोन सामन्यांना मुकणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---