---Advertisement---

ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगच्या स्थगित हंगामास ‘या’ दिवशी पुन्हा होणार सुरुवात

On: रविवार, एप्रिल 11, 2021 4:25 PM
---Advertisement---

मागील महिन्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे पाकिस्तान सुपर लीग २०२१ चा हंगाम अर्ध्यात स्थगित करण्यात आला होता. परंतु नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा हंगाम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. १ जून रोजी हंगामातील उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. तर २० जून रोजी पीएसएल २०२१ चा अंतिम सामना होणार आहे.

या लीगमध्ये सहभागी झालेले तब्बल ७ सदस्य मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

पीएसएलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १ मार्च रोजी सापडला होता. इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेला ऑस्ट्रेलियन फिरकीपटू फवाद अहमद सर्वप्रथम कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्यानंतर कराची किंग्स संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यासह २ परदेशी खेळाडू कोरोना संक्रमित झाले. त्यानंतर क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग असलेल्या टॉम बंटनने आपल्यासह ३ खेळाडू कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याची माहिती दिली होती.

यानंतर पुढे अजून ३ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ६ खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफमधील १ सदस्य असे मिळून एकूण ७ जण ४ दिवसात कोरोना संक्रमित झाल्याने पीएसएलच्या आयोजन समिती आणि फ्रँचायझींच्या मालकांची ४ मार्च रोजी बैठक भरवण्यात आली होती. या बैठकित उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला होता.

परंतु आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा पीएसएल २०२१ चा सुरू करण्याचे ठरवले आहे. पीएसएलमध्ये सहभागी संघ, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना २२ मे पासून क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर निगेटिव्ह आलेल्या संघांना २९ मे पासून सराव करण्याची सूट दिली जाईल. यामुळे आता पुन्हा चाहत्यांना पीएसएल सामन्यांचा रोमांच पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

SRHvKKR: सामन्यापुर्वी वातावरण तापलं! राशिद खान अन् केकेआरच्या खेळाडूच्या पत्नीमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

KKRच्या कर्णधाराचा मोठा डावपेच, गतवर्षी फ्लॉप ठरलेल्या ‘या’ खेळाडूला पहिल्याच सामन्यात उतरवणार मैदानात!

विजयाच्या जल्लोषात दुखापतीची चिंता; दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ स्टार क्रिकेटपटू जखमी, दोन सामन्यांना मुकणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---