---Advertisement---

‘पटेल इंडियन हो या न्यूझीलंड का, कमालही करता है’; १० विकेट्स घेणाऱ्या अजाजचे सोशल मीडियावर होतंय कौतुक

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस (०४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेल याने गाजवला. त्याने या दिवशी भारताच्या दहाच्या दहा फलंदाजांना बाद करत इतिहासाला गवसणी घातली. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेट्स घेणारा केवळ तिसराच गोलंदाज बनला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक करणाऱ्या ट्वीट्सचा वर्षाव होतो आहे. अगदी आजी, माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्याची भरपूर स्तुती केली आहे.

अजाजच्या ऐतिहासिक कामगिरीची सुरुवात झाली भारताच्या युवा सलामीवीरीच्या विकेटपासून. अजाजने सर्वप्रथम सलामीवीर शुबमन गिलला (४४ धावा) आपल्या जाळ्यात फसवले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली अशा अनुभवी शिलेदारांना त्याने शून्यावर तंबूत धाडले. पुढे श्रेयस अय्यर (१८ धावा) त्याचा पहिल्या दिवसातील शेवटचा विकेट ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृद्धिमान साहा (२७ धावा) आणि आर अश्विन (० धावा) यांच्या त्याने एकाच षटकात सलग २ विकेट्स घेतल्या आणि इतिहास रचण्याकडे वाटचाल सुरू ठेवली.

पुढे भारताच्या आघाडीच्या ६ फलंदाजांना बाद केल्यानंतर त्याचा सर्वात मोठा बळी ठरला, भारताचा दीडशतकवीर मयंक अगरवाल. टॉम ब्लंडलच्या हातून त्याने १५० धावांवर खेळत असलेल्या अजाजला झेलबाद केले. पुढे मैदानावर तळ ठोकलेल्या अष्टपैलू अक्षर पटेललाही त्याने अर्धशतकी खेळी केल्यानंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर रचिन रविंद्रच्या मदतीने खालच्या फळीतील जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांनाही पव्हेलियनला पाठवत त्याने १० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

अशाप्रकारे कसोटी इतिहासातील अतिशय प्रशंसनीय अशी कामगिरी करत तो क्रिकेटप्रेमींच्या नजरेत आला आहे. खुद्द कसोटीतील हा प्रशंसनीय विक्रम करणाऱ्या अनिल कुंबळे यांनीही त्याचे कौतुक केले आहे. त्यांच्याबरोबरच भारतीय दिग्गज व्हिव्हिएस लक्ष्मण, पार्थिव पटेल, याबरोबरच सॅम बिलिंग्स, अभिनव मुकंद, मिचेल मॅक्लेघन अशा बऱ्याचशा क्रिकेट शिलेदारांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचं फुटकं नशीब! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाता तोंडाशी आलेला विजय निसटला, दुसरा कसोटी अनिर्णित

कडक सॅल्युट! काल ज्या भिंतीवरचा इतिहास वाचत होता, आज त्याच भिंतीवर त्याने स्वतःच नाव कोरलंय

याचि देही याचि डोळा! द्रविड-श्रीनाथने तिसऱ्यांदा अनुभवला ‘परफेक्ट टेन’चा थरार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---