---Advertisement---

“तेवतियाने पुन्हा ट्वीटीया बनवलं”, दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानचा राहुल तेवतिया झाला ट्रोल

On: गुरूवार, ऑक्टोबर 15, 2020 11:27 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये बुधवारी (14 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 13 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या मदतीने दिल्लीने 20 षटकांत 7 बाद 167 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला 20 षटकांत केवळ 148 धावा करता आल्या. या विजयानंतर दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.

राजस्थानच्या गोलंदाजांनी दिल्लीविरुद्ध चांगली कामगिरी बजावली परंतु फलंदाजांनी पुन्हा निराश केले. त्यामुळेच या संघाला हंगामातील 5 व्या पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात राजस्थानच्या वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी नियमीत कालांतराने विकेट्स गामवल्याने संघाला विजय मिळवून देणयाची जबाबदारी पुन्हा एकदा 7 व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या अष्टपैलू राहुल तेवतियावर आली होती. पण तो दिल्लीच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर 18 चेंडूत नाबाद 14 धावाच करू शकला. अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पादेखील पुन्हा एकदा मोठा डाव खेळू शकला नाही आणि तो 22 चेंडूंत 32 धावा काढून बाद झाला.

त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर ट्विटरवर राहुल तेवतियाबद्दल बर्‍याच प्रतिक्रिया उमटल्या. चला जाणून घेऊ त्यापैकी काही खास प्रतिक्रिया.

https://twitter.com/PiyushS24196569/status/1316434282227748864?s=20

https://twitter.com/MukeshHappiest/status/1316434236337946625?s=20

याबरोबरच दिल्लीच्या गोलंदाजांचे ट्विटरवर कौतुकही झाले आहे. दिल्लीकडून एन्रीच नॉर्किएने शानदार गोलंदाजी केली. या सामन्यादरम्यान त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडूही टाकला. त्याने राजस्थानच्या डावातील तिसऱ्या षटकाचा पाचवा चेंडू तब्बल १५६.२२ किमी दर ताशी वेगाने टाकला. हा आयपीएलच्या १३ हंगामाच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे.

https://twitter.com/joeys_chandler/status/1316434958567653377?s=20

राजस्थानचा पुढील सामना 17 ऑक्टोबरला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी दुपारी 3.30 वाजता दुबई येथे होणार आहे. या सामन्यात राजस्थानचे फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---