---Advertisement---

छा गये पांडेजी ! राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर ट्विटरवर मनीष पांडेच्याच नावाचा कल्ला

On: शुक्रवार, ऑक्टोबर 23, 2020 10:45 AM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 40 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानला 8 गडी राखून पराभूत केले. हैदराबादचा स्टार फलंदाज मनीष पांडे या विजयाचा नायक ठरला. त्याने 83 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याचे ट्विटरवर चांगलेच कौतुक होत आहे. या लेखात आपण त्यापैकीच काही ट्विट्स पाहाणार आहोत

https://twitter.com/cricketaakash/status/1319327177473708032?s=19

https://twitter.com/KrisSrikkanth/status/1319328633102581760?s=19

https://twitter.com/rpsingh/status/1319329239116640262?s=19

https://twitter.com/Trendulkar/status/1319329060347015168?s=19

https://twitter.com/mohanstatsman/status/1319329843784318979?s=19

https://twitter.com/tiwarymanoj/status/1319330493762920448?s=19

https://twitter.com/MSDian_forever/status/1319330082192683008?s=19

https://twitter.com/anushmita7/status/1319331335786299392?s=19

https://twitter.com/hemanthraju567/status/1319330758016708608?s=19

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबादने 19 व्या षटकात केवळ दोन गडी गमावून विजय मिळविला. मनीष पांडेने केलेल्या 83 धावांच्या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आहे.

हैदराबादचे सलामीवीर जॉनी बेयरस्टो आणि डेविड वॉर्नर डावाच्या सुरुवातीलाच बाद झाले होते. अष्टपैलू विजय शंकर आणि मनीष पांडे यांनी तिसऱ्या गड्यासाठी 140 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. विजय शंकरने 52 धावांची खेळी करून या विजयात मोलाची कामगिरी पार पडली.

राजस्थान संघातर्फे कोणताच फलंदाज अधिक काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. राजस्थानचा युवा फलंदाज संजू सॅमसनने सर्वाधिक 36 धावा केल्या.

हा हैदराबादचा या हंगामातील चौथा विजय होता. या विजयानंतर हैदराबाद गुणतालिकेत 5 व्या स्थानी आला आहे. हैदराबादचा पुढील सामना 24 ऑक्टोबरला पंजाबशी होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी, युवराज, रैना बिग बॅश लीगमध्ये खेळणार?

आनंदाची बातमी! भारत- ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेला २७ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

RRच्या गोलंदाजांवर SRHचे फलंदाज ठरले भारी; विजय मिळवत घेतली पाचव्या क्रमांकावर उडी

ट्रेंडिंग लेख –

स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतानाही सामना पाहाताना कोठून येतो त्यांचा आवाज? घ्या जाणून

नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर

आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---