इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील पहिला क्वालिफायार सामना गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना मुंबईने एकहाती जिंकला. मुंबईने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला अवघ्या 143 धावा करता आल्या. या महत्वाच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगची ट्विटरवर जोरदार खिल्ली उडतेय.
https://twitter.com/djdumass/status/1324395898839818240?s=19
https://twitter.com/RomanaRaza/status/1324393506840866822?s=19
https://twitter.com/CSKian716/status/1324389117057093632?s=19
https://twitter.com/aashish_sarda/status/1324386995502682113?s=19
https://twitter.com/AustenJane023/status/1324382585682681861?s=19
https://twitter.com/RomanaRaza/status/1324382215367651328?s=19
https://twitter.com/sanket7262/status/1324383068178714626?s=19
https://twitter.com/Ashok_blue_b/status/1324384593114357760?s=19
https://twitter.com/Slytherin_007/status/1324382479327715328?s=19
https://twitter.com/KukrejaShubhs/status/1324384904512106496?s=19
https://twitter.com/Rain_Man25/status/1324387129489698816?s=19
https://twitter.com/AatifKh96914765/status/1324394560009592832?s=19
https://twitter.com/aboutdilip/status/1324397665950445569?s=19
https://twitter.com/rajeshkasakani/status/1324400090614620160?s=19
मुंबईने केल्या 200 धावा
नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई संघ प्रथम फलंदाजी करायला मैदानात आला. सलामीवीर क्विंटन डिकॉकने 40 धावांची आक्रमक खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 38 चेंडूत 51 धावा केल्या. युवा प्रतिभावान फलंदाज ईशान किशननेही 55 धावांची उत्कृष्ट खेळी केली. अखेरच्या षटकांत ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने (14 चेंडू 37 धावा) केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने 20 षटकांत 200 धावा केल्या.
दिल्लीचा झाला पराभव
प्रत्युत्तरादाखल दिल्लीची सुरुवात अतिशय खराब झाली. एकही धाव न काढता दिल्लीने 3 गडी गमावले.अवघ्या 41 धावांवर दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (46 चेंडू, 65 धावा) आणि अक्षर पटेलने (33 चेंडू, 42 धावा ) चांगली खेळी केली पण त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. दिल्लीला 20 षटकांत केवळ 143 धावा करता आल्या.
आर अश्विनने केली उत्कृष्ट गोलंदाजी
दिल्लीचा फिरकरीपटू आर अश्विनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 29 धावा देऊन 3 बळी घेतले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि आक्रमक फलंदाज कायरान पोलार्ड या तीन महत्वाच्या फलंदाजांना त्याने तंबूत पाठवले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020- विराट कोहलीच्या RCB समोर वॉर्नरच्या SRHचे आव्हान; कोणाचा प्रवास थांबणार?
मुंबई इंडियन्स फायनलमध्ये गेल्यानंतर रोहित शर्मा भलताच खुश, म्हणाला…
Video: …आणि त्याने चेंडू खाली पडूच दिला नाही; पाहा राहुल चाहरने घेतलेला अवघड झेल





